मुंबई

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्वसमावेशक प्रशिक्षणासाठी आराखडा

CD

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्वसमावेशक प्रशिक्षणासाठी आराखडा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचा आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत व डॉ. सरिता हजारे आदी उपस्थित होते. तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

आरोग्य विभागामार्फत नियुक्त सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे आणि डॉ. मोहन जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा अधोरेखित केला. मंत्री आबिटकर म्हणाले, की ‘राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा स्तरावरील आरोग्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी प्रभावी सेवा देण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. राज्यातील प्रशिक्षण संस्था इतक्या सक्षम व सर्वसमावेशक असाव्यात की इतर राज्यांतील कर्मचाऱ्यांनाही येथे प्रशिक्षण घेण्याची इच्छा निर्माण व्हावी.’ तालुका आरोग्य अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक असून प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा आवर्जून समावेश करण्यात यावा. पदसंवर्गनिहाय प्रशिक्षणाचा सविस्तर आराखडा तयार करून तो एका महिन्याच्या आत मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश मंत्री आबिटकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

Dapoli News : कोकण दीपकाडीला जागतिक व्यासपीठ; संवर्धनासाठी जनतेला मतदानाचे आवाहन

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

SCROLL FOR NEXT