मुंबई

पक्षप्रवेशाचे वारे पाठींब्याचे सत्र सुरु

CD

पक्षप्रवेशाचे वारे; पाठिंब्याचे सत्र सुरू
वसई-विरार महापालिका निवडणुकीत राजकीय स्पर्धेला वेग

वसई, ता. १० (बातमीदार) : वसई-विरार महापालिका निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा विजय व्हावा, या दृष्टीने नाराज कार्यकर्त्यांचा प्रक्षप्रवेश, त्यासोबतच विविध मंडळांच्या जाहीर पाठिंबा सत्राचे जोरदार वारे वाहू लागले आहेत.
वसई-विरार महापालिकेच्या २९ प्रभागांमध्ये एकूण ११५ सदस्य संख्या असणार आहे. २८ प्रभागांत चार, तर शेवटच्या २९व्या प्रभागात एकूण तीन सदस्य निवडून येतील. महायुतीविरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी येथे चुरशीची लढत पाहण्यास मिळेल. बहुजन विकास आघाडीसोबत मनसे व काँग्रेस एकत्रितपणे लढत असून महायुतीला आपली ताकद लावावी लागणार आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार पक्षासह काही प्रमुख अपक्षांच्या लढतीही यंदा महत्त्वाच्या ठरतील. येथे पूर्वी प्रभागाप्रमाणे मतदान केले जात होते; परंतु आता एका प्रभागातून चार उमेदवारांचे पॅनेल उभे असल्याने या चारही उमेदवारांनी निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाकडे वाढली आहे. निवडणुकीला आता काही दिवस शिल्लक असताना नाराज कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्याची चढाओढदेखील येथे पाहण्यास मिळत आहे. रोजच कोणत्या ना कोणत्या पक्षातील कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश येथे सुरू आहेत. तसेच विविध पक्ष येथील काही सामाजिक मंडळ तसेच पक्षातील नाराज गटाच्या मंडळींकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता याचा फायदा नेमका कोणाला मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

------------------
उमेदवार, कार्यकर्त्यांची दमछाक

प्रभाग मोठे असल्याने चारही उमेदवारांना दारोदारी असो किंवा परिसरात प्रचार करण्यावर भर द्यावा लागत आहे. आता काहीच दिवस शिल्लक राहिल्याने शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची दमछाक होण्याची शक्यता आहे.

-----------
महापौरांच्या खुर्चीकडे लक्ष

महापालिकेवर आपलाच झेंडा फडकणार, असा दावा महायुती व बहुजन विकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. महापौरपदाची खुर्ची मिळवण्यासाठी या दोघांसह इतर पक्षांनीही जोर लावला आहे. आता या राजकीय स्पर्धेत कोण बाजी मारणार व महापौरपदाचा सन्मान कोणाला मिळणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पूजा खेडकरच्या घरी चोरी, ८ दिवसांपूर्वी घरकामाला आलेल्या नेपाळी कामगाराने सगळ्यांचे मोबाईल नेले चोरून

BMC Election: ना प्रचाराचा धुरळा, ना आरोपांच्या फैरी! काय चाललंय मुंबईतील मतदारांच्या मनात?

Indian Railway: ब्रिटिश पोशाखाला अलविदा! आता भारतीय रेल्वेमध्ये गणवेशात येणार आधुनिक टच, अश्विन वैष्णव यांची घोषणा

'तान्हाजी द अनसंग वॉरियर'चा येणार सिक्वेल ? अजयच्या त्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’ द्वेषाचा क्रूर चेहरा उघड: चंद्रशेखर बावनकुळे; पैसे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र!

SCROLL FOR NEXT