जिल्ह्यातील ५४ हजार महिला ''लखपती दीदी''
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी घेतला आढावा
ठाणे, ता. ८ : ग्रामीण महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि बचत गटांच्या माध्यमातून शाश्वत रोजगार निर्माण करण्यावर अधिक भर द्यावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दिले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांना उद्दिष्टपूर्तीसाठी परस्पर समन्वय साधण्याचे आदेश दिले. बैठकीत संस्थात्मक बांधणी, प्रवर्गनिहाय कुटुंब समावेश, खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी, जोखीम प्रवणता निधी, बँक पतपुरवठा, विमा संरक्षण, वैयक्तिक बँक कर्ज तसेच उपजीविका वृद्धीच्या विविध उपक्रमांचा सखोल आढावा घेण्यात आला. यामध्ये औजार बँक, उत्पादक गटांना निधी वितरण, एंटरप्रायझेस विकास, परसबाग उपक्रम, ‘लखपती दीदी’ योजना, उद्योग आधार, फूड लायसन्स, पीएमएफएमई अंतर्गत सिड कॅपिटल व ३५ टक्के अनुदान, स्मार्ट एफपीसी, ऑनलाईन उत्पादने, ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’, एसव्हीईपी, एमईडी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन यादव यांनी केले. तसेच, पीएमएफएमइअंतर्गत ३५ टक्के अनुदान आणि सिड कॅपिटलचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्या तातडीने सोडवण्याचे धोरण या बैठकीत निश्चित करण्यात आले.
''लखपती दीदी'' योजनेची स्थिती
जिल्ह्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ''लखपती दीदी'' योजनेत ठाणे जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. यावेळी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ठाणे जिल्ह्यात एकूण ४५,८४४ ‘लखपती दीदी’ उद्दिष्टे निश्चित केली होती. त्यापैकी ४७,७३२ महिलांनी लखपती दर्जा प्राप्त केला आहे. चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) एकूण ४२,१७६ लखपती दीदी उद्दिष्टे असून, डिसेंबर २०२५ अखेर ७,२५२ महिलांनी लखपती दर्जा मिळविला आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५४,३८३ महिला ‘लखपती दीदी’ बनल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.