मुंबई

केंद्रीय राज्यमंत्र्यांचा मतदारांशी मातृभाषेत संवाद

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांच्या उपस्थितीत खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल परिसरात प्रभाग क्रमांक ४ ते १६ मधील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठका पार पडल्या. मंत्री गोपी यांनी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या बैठकींना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, रमेश नायर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली आणि खारघर परिसरात मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतीय नागरिक वास्तव्यास असल्याने मंत्री सुरेश गोपी यांनी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधत त्यांच्याशी आपलेपणाने चर्चा केली. केंद्र सरकारने विकासाची गंगा घराघरात पोहोचवली असून, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची गती कायम राखण्यासाठी महायुतीची सत्ता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात मंत्री गोपी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. उज्ज्वला योजना, तसेच नैसर्गिक वायू क्षेत्रातील प्रगतीमुळे सर्वसामान्य महिलांचे जीवन अधिक सुसह्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. पनवेलचा विकास हा ‘विकसित भारत’ या संकल्पनेचा तो महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या बैठकींना भाजपच्या माजी जिल्हा सचिव संध्या शरबिद्रे, यमुना प्रकाशन, खारघर महिला मोर्चा अध्यक्ष साधना पवार, तसेच विविध महिला पदाधिकारी, दक्षिण सेल, तमिळ सेलचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी महायुतीचे प्रभाग क्रमांक ४ ते १६ मधील सर्व उमेदवारही व्यासपीठावर उपस्थित होते. मंत्री सुरेश गोपी यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका फेटाळली, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

Pune News: युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले; आयात तात्पुरती थांबली, टोमॅटो अडीचशे तर कांदा पावणे दोनशे रुपये किलाे!

Thane News: ठाणेकरांसाठी मोठा दिलासा! प्रॉपर्टी टॅक्सच्या दंडावर तब्बल 90% सूट जाहीर; अंतिम मुदत किती? जाणून घ्या...

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT