मुंबई

गावठी कट्टा, काडतूस बाळगणाऱ्याला अटक

CD

कल्याण, ता. १० (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. याच दरम्यान बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे यांना मिळालेल्या माहितीनुसार, शफिक गफुर सैय्यद ऊर्फ बगला हा दुर्गामाता मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी पुलाखाली देशी बनावटीचा गावठी कट्टा घेऊन कारमधून फिरत असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत आंधळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून कारवाई केली. बगला याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, ८०० रुपयांचे दोन जिवंत काडतुसे, तसेच दोन लाख रुपये किमतीची कार असा एकूण दोन लाख ४० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बगला याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त अतुल झेंडे व सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत वरिष्ठ निरीक्षक सुरेशसिंग गौड, निरीक्षक डुकळे, सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार पी. एम. बाविस्कर, एम. आर. चित्ते, बी. आर. बागुल, आर. एस. भालेराव, आर. जी. पाटील, शिपाई ओ. बी. आंधळे व आर. ओ. ईशी यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT