मुंबई

उलवेतील रस्त्यांची दुरावस्था

CD

उलवेतील रस्त्यांची दुरवस्था
साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी; खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता
उलवे, ता. १० (बातमीदार) : उलवे नोड सेक्टर २४, २५ व २५-ए परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यासोबत मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. संपूर्ण रस्ते चिखल, पाणी व खोल खड्ड्यांनी व्यापलेले असल्याने दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनचालकांना अक्षरशः कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून, काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार उलव्यातील रस्त्यांकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. नागरी विकास झपाट्याने होत असला तरी मूलभूत सुविधा वेळेत व दर्जेदार मिळत नसल्याची तक्रार रहिवाशांकडून केली जात आहे. उलवे शहराच्या विस्तारानुसार पायाभूत सुविधा मजबूत होणे आवश्यक असून, नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.

खोदकामाचे दुष्परिणाम

अंडरग्राउंड केबल्स, ड्रेनेज आणि इतर दुरुस्ती कामांसाठी वारंवार रस्ते खोदले जातात. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर अनेक रस्ते अर्धवट स्थितीत, वाळू-खडी टाकून वापरात सोडले जातात. त्यामुळे खड्डे, चिखल आणि पाणी साचण्याच्या समस्येत मोठी वाढ झाली आहे. नागरिकांच्या मते काँक्रीटीकरण, निचरा व्यवस्था व कायमस्वरूपी दुरुस्ती उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे.

कोट

अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ तात्पुरती डागडुजी होते. काही दिवसांनी पुन्हा खड्डे पडतात. लहान मुले व महिलांना चालणे अवघड झाले आहे. पावसाळा नसतानाही पाणी साचणे ही ड्रेनेजमधील गंभीर त्रुटी आहे.
- विजय म्हात्रे, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT