मुंबई

डॉ. पतंगराव कदम यांना वैचारिक आदरांजली

CD

डॉ. पतंगराव कदम यांना वैचारिक आदरांजली
बेलापूर येथे ‘महाराष्ट्र : कालचा आणि आजचा’वर व्याख्यान

उलवे, ता. १० (बातमीदार) : भारती विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमालेतून त्यांना वैचारिक आदरांजली वाहण्यात आली. बेलापूर येथील भारती विद्यापीठ संचालित महाविद्यालयात ‘महाराष्ट्र : कालचा आणि आजचा’ या विषयावर व्याख्यान पार पडले. याप्रसंगी ‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी कदम यांच्या विचारांचा आदर्श तरुणांनी घ्यावा, असे प्रतिपादन केले.

डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बेलापूर सेक्टर ३ येथील भारती विद्यापीठाच्या हॉटेल मॅनेजमेंट संकुलात शुक्रवारी (ता. ९) आयोजित व्याख्यानमालेचा लाभ घेण्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमालेत बोलताना गडपाले यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक वाटचालीचा सखोल आढावा घेत प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीने आता अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक राहण्याची गरज असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमापूजनाने झाली. प्राध्यापक आर. एच. कदम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य निकिता खानविलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समन्वय केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT