मुंबई

महानगर गॅस पुरवठा आठ तास बंद

CD

महानगर गॅसपुरवठा आठ तास बंद
कल्याण (वार्ताहर) : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर निवासी क्षेत्रात शनिवारी (ता. १०) महानगर गॅसपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची नोटीस कंपनीने दिली असली, तरी वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या वर्षभरात अनेकदा नोटीस देऊन किंवा गॅसगळतीसारख्या दुर्घटनांमुळे पुरवठा अचानक बंद राहण्याचे प्रकार घडले आहेत. महानगर गॅस आल्यामुळे अनेक ग्राहकांनी आपले जुने गॅस सिलिंडर परत केले आहेत. अशा वेळी अचानक गॅस बंद झाल्यामुळे गृहिणींची मोठी गैरसोय होत असून, जेवणासाठी नागरिकांना पोळी-भाजी केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे.
मिलापनगर परिसरातील रहिवासी केवळ गॅसपुरवठ्यामुळेच नव्हे, तर वीज आणि पाणीपुरवठ्याबाबतही प्रचंड त्रस्त आहेत. महानगर गॅस वारंवार बंद राहत असल्याने काहींनी विद्युत शेगड्या खरेदी केल्या; पण वीजपुरवठाच नसेल तर त्याचाही उपयोग होत नाही, असे सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli BJP vs Congress politics : सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसचा गणिमी कावा; मिरजमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्वच एकवटले

Shivam Dube: साधेपणा pro-max! वर्ल्डकप जिंकून देणारा शिवम दुबे चक्क रेल्वेने घरी, नेटकऱ्यांनी केला सलाम

Latest Marathi News Live Update : विधानभवनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Chandoli Forest Leopard Sighting : सांगलीच्या चांदोलीत वाघांनंतर आता 'या' दुर्मिळ पाहुण्याची एन्ट्री; सफारीदरम्यान पर्यटकांना मिळालं खास सरप्राईज!

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

SCROLL FOR NEXT