मुंबई

काॅँग्रेसचे सुशांतराजे पाटील शिवसेनेत प्रवेश

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : काॅँग्रेसचे माजी प्रवक्ते ॲड. सुशांतराजे पाटील यांचा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज प्रवेश झाला. निवडणुकीत चाळीस वर्षांत पक्षाने कोणतेही पद न देता सतत अवहेलना केल्याने नाराजी होऊन आपण काॅँग्रेस पक्ष सोडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काॅँग्रेसने ज्या जागा सोडल्या त्या ठिकाणी आधी चर्चा करून सोडायला हव्या होत्या; पण तसे न करता ज्या जागा सोडल्या तेथे मित्रपक्षाने उमेदवारच दिले नाहीत, तर काही ठिकाणी उमेदवार सक्षम दिले नाहीत, अशा पद्धतीने पक्षाचा कारभार चालला आहे. त्याबद्दल ॲड. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला आजपर्यंत पक्षाने कोणत्याही निवडणुकीत तिकीट दिले नाही, पक्षाने कमिटी दिली नाही; तरीही आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. आमची नेहमीच अवहेना झाली म्हणून पक्ष सोडला, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. दिवंगत खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काॅँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या नेतृत्वात २००० ते २००३पर्यंत ते पक्षाचे प्रवक्ते होते.
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT