मुंबई

मुले पळविण्याच्या घटना केवळ अफवा,

CD

मुले पळविण्याच्या घटना केवळ अफवा,
नागरिकांना विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

मोखाडा ता. ११ ( बातमीदार ) - मोखाडा तालुक्यासह पालघर जिल्ह्यात मुले पळवून नेण्याच्या अफवा समाज माध्यमातून पसरवल्या जात आहेत. मात्र, अशा घटना कुठेही घडलेल्या नाहीत. त्यामुळे सर्व सुजान नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पालघर जिल्हा पोलीस दलासह मोखाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी केले आहे.
मुले चोरणारी अथवा पळवणारी टोळी पालघर जिल्ह्यात कार्यरत असल्याच्या घटनेने डहाणूत १६ एप्रिल २०२० मध्ये साधू हत्याकांड घडले होते. या घटनेने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला होता. या घटनेला धार्मिक वळण देखील लागले होते. त्यामुळे त्याचे मोठे दूरगामी परिणाम झाले होते. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. अशात आता पालघर जिल्ह्यात पुन्हा मुले पळवून नेण्याच्या अफवा समाज माध्यमातून पसरविल्या जात आहेत. या अनुषंगाने मोखाडा पोलिसांनी याबाबत खात्री केली असता, अशा स्वरुपाचा कुठलाही प्रकार नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मोखाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी समाज माध्यमातून नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT