मुंबई

पान ३ पट्टा

CD

जव्हारच्या इतिहासावर पुस्तकातून प्रकाशझोत
विक्रमगड (बातमीदार) : जव्हार संस्थानच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा वेध घेणारे ''जव्हार संस्थानचा राजकीय इतिहास'' हे संशोधनात्मक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ओंदे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास संशोधक प्रा. डॉ. विनोद संभाजी सोनवणे यांनी हे पुस्तक लिहिले असून, या निमित्ताने एका ''मुलखावेगळ्या'' आदिवासी संस्थानचा इतिहास वाचकांसमोर आला आहे. मुळात संस्थानांचा इतिहास हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. जव्हारसारख्या चिमुकल्या, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या आदिवासी संस्थानची निवड करून लेखकाने या भागातील दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकला आहे.

-----------------------------------

सुरज भुयाळ उपसरपंचपदी बिनविरोध

कासा (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मुरबाड येथे उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. ग्रामविकास अधिकारी सुमित्रा कामडी, सरपंच रवींद्र बेंदर तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक घेण्यात आली. माजी उपसरपंच स्वप्नील सापटा यांनी शासकीय सेवेत रुजू झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सुरज कृष्णा भुयाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह माजी पंचायत समिती सदस्य शैलेश हाडळ, सामाजिक कार्यकर्ते सचिन लहांगे, राजेश कासट, बाबुराव धांगडा, संदेश पाडेकर, संजू लहांगे, प्रतिभा पाडेकर, वैष्णवी बुंधे, जानकी पाटकर, दिपक कामडी, समीर खरपडे, किशोर दुमाडा, प्रशांत गहाला आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------------------------------

गाव-पाड्यांमध्ये ग्रामविकासाचे कार्य

वाणगाव (बातमीदार) : सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील बोईसर, सफाळे व वाडा या परिसरातील एकूण २१ गाव-पाड्यांमध्ये ग्रामविकासाचे कार्य सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत सेंद्रिय शेती, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य व जनजागृती अशा विविध विषयांवर संस्थेकडून मार्गदर्शन व आवश्यक ती मदत केली जात आहे. संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या गावांमधील प्रत्येक शेतकरी दोन हंगामात सेंद्रिय शेती करत आहे. यासोबतच शेतीपूरक व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही गावकऱ्यांना दिले जात आहे. परिणामी, गावकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी संस्थेसोबत जोडले गेले असून विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेत आहेत. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने बोईसर व सफाळे परिसरातील एकूण ६८ शेतकरी व महिलांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यात सहभागी लाभार्थ्यांनी शेती व शेतीपूरक व्यवसायांची माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

SCROLL FOR NEXT