मुंबई

उन्हाळी हंगामासाठी शेतकरी सज्ज

CD

उन्हाळी हंगामासाठी शेतकरी सज्ज
डहाणू तालुक्याला ‘सूर्या’च्या कालव्यातून पाणी
कासा, ता. ११ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी, कवडास धरणांच्या उजव्या, डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे डहाणू तालुक्यातील शेकडो गावातील उन्हाळी शेतीला उभारी मिळणार आहे.
सूर्या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या अशा दोन प्रमुख कालव्यांद्वारे मुख्य कालवा सुमारे ८० किलोमीटर लांबीचा असून, त्याला जोडलेले लहान-मोठे उपकालवे ३०० ते ३५० किलोमीटरपर्यंत विस्तारले आहेत; मात्र कालवे जुने झाल्याने अनेक ठिकाणी पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. गेल्या दोन वर्षांपासून कालव्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे उन्हाळी भात, भाजीपाला लागवड करता येणार आहे.
------------------------
दुबार शेतीकडे कल
डाव्या कालव्यात ३१ डिसेंबरला व उजव्या कालव्यात शुक्रवारी (ता. ८) पाणी सोडण्यात आल्याने भातपेरणी तसेच शेतीची कामे उशिरा सुरू झाली आहेत. या सिंचन पाण्यावर अनेक शेतकरी दुबार भातशेती तसेच भाजीपाला लागवड करतात. दोन वर्षांत अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाळी शेतीपेक्षा उन्हाळी हंगामातील भातशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.
-----------------------
कालव्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम उशिरापर्यंत काम चालू असल्याने ३१ डिसेंबरला डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले, तर शुक्रवारी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.
- प्रवीण भुसारे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग
---------------------------
डहाणू तालुक्यात कालव्याच्या पाण्यावर भाजीपाला, भातशेती करतो. पावसाळी शेतीपेक्षा उन्हाळी शेती फायदेशीर असून नुकसान, रोगराईची शक्यता कमी असते. त्यामुळे अनेक शेतकरी दुबार पीक घेत आहेत.
- प्रशांत सातवी, शेतकरी, वाघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT