मुंबई

राजकीय ठस्सन''मुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात

CD

प्रचाराचा पोलिसांना ‘ताप’
उल्हासनगरात राजकीय राड्यामुळे डोकेदुखीत वाढ
उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच उल्हासनगरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. किरकोळ वादांचे रूपांतर उग्र संघर्षात होत असून, शहरात ठिकठिकाणी राडा, शिवीगाळ आणि धमकावण्याचे प्रकार समोर येत आहेत. या वाढत्या राजकीय राडेबाजीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, पोलिस प्रशासनावर मोठा ताण आला आहे.

कॅम्प ५ मधील पॅनेल १७ अंतर्गत भाटिया हॉस्पिटल परिसरात वादाची ठिणगी पडली. ड्रेनेजच्या गटार साफसफाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व समर्थक आमनेसामने आले. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात दोन्ही गटांकडून एकमेकांवर गुंडागर्दी आणि दादागिरीचे आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. येथे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या सत्ताधारी मित्रपक्षांच्या रॅली आमनेसामने आल्याने जोरदार शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाली.

कार्यकर्त्यांना धाक
भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर चारचाकी वाहन घालून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. काही प्रभागांत राजकीय पक्षांचे झेंडे जाळल्याच्या घटना घडल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शहरातील वाढत्या संवेदनशील घटनांमुळे पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रत्येक प्रभागात बंदोबस्त तैनात करताना पोलिसांची दमछाक होत आहे. निवडणूक काळात कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने कायदा हातात घेऊ नये. शांतता भंग करणाऱ्यांवर आणि सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Book Festival Poor Response: लाखोंचा खर्च, पण वाचक गायब; जालना ग्रंथोत्सवाकडे साहित्यप्रेमींची पाठ;पुस्तक प्रदर्शनात दिवसभर वाचकच नाहीत

Pune Heatwave Alert : पुणेकरांनो सावधान! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा

बाबो! बिग बॉसनंतर छोटा पुढारी सिनेमात दिसणार, पिक्चर बाईज सिनेमामध्ये हटके अभिनय, नेटकरी म्हणाले...

T20 World Cup नंतरही भारतात अडकलेले वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेचे अखेर मायदेशी परतणार; ICC कडून तिकीटांची सोय

Darpan Award for Padma Shri Dr. Smita Kolhe: मेळघाटातील सेवाकार्यासाठी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना परभणीत दर्पण पुरस्कार

SCROLL FOR NEXT