मुंबई

महावितरणचा वीजचोरांवर दणका

CD

महावितरणचा वीजचोरांवर दणका
३४ वीजचोरांविरोधात गुन्हे दाखल
पाच लाखांहून अधिक रुपयांची वीज चोरी उघड
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ ः महावितरणने वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांविरोधात अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. टिटवाळा उपविभागांतर्गत गोवेली ग्रामीण शाखेच्या हद्दीत ३४ वीजचोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, मागील तीन महिन्यांत सुमारे पाच लाख ३२ हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.
महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी नियमितपणे ग्राहक मीटर तपासणी मोहीम राबविण्यात येते. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत टिटवाळा उपविभागात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गोवेली ग्रामीण शाखा अंतर्गत अनेक ग्राहक चोरून वीज वापरत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. ७) तक्रार दाखल झाली होती. यानुसार वरप, म्हारळ व कांबा परिसरातील ३४ वीजग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोवेली ग्रामीण शाखेचे कनिष्ठ अभियंता सचिन पवार यांनी याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.
महावितरण कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, कल्याण-दोन मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय फुंदे व कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, कनिष्ठ अभियंता सचिन पवार, सहाय्यक अभियंते निलेश शिर्के, धनंजय पाटील, तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंता योगेश चेंदवणकर तसेच गोवेली ग्रामीण शाखेतील कर्मचारी सहभागी झाले होते.

महावितरणचे आवाहन
महावितरणने नागरिकांना वीज चोरी टाळून कायदेशीर वीज वापरण्याचे आवाहन केले असून, वीज चोरी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT