मुंबई

ठाणे रेल्वे स्थानकावरील चोरीचा गुन्हा उघडकीस

CD

वसईतून चोरट्याला अटक
ठाणे, ता. ११ : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटावरून प्रवाशाची सॅकबॅग लंपास करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात ठाणे लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. संतोष गौतम (वय २६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो वसईचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. १ डिसेंबर २०२५ रोजी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ८ वरील पाणपोईजवळून एका प्रवाशाची सॅकबॅग चोरीला गेली होती. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असताना पोलीस हवालदार सुतार, शेळके आणि राऊत यांना संतोष गौतमच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून २६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात चांदीचे पैंजण, कानातील कर्णफुले, नाकातील नथणी, गुलाबी रंगाचे पाकीट आणि रोख दोन हजार रुपयांचा समावेश आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने व सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बुधवारी (ता. ७) रोजी पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी करत गुन्ह्याचा छडा लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ला; भारतीयांच्या मृत्यूने तणाव वाढला, केंद्र सरकारचा इशारा

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT