मुंबई

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल मुंबई विद्यापीठाला कांस्यपदक

CD

आंतर विद्यापीठ बेसबॉल मुंबई विद्यापीठाला कांस्यपदक
संघात एसएसटी कॉलेजच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : मुंबई विद्यापीठाने भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत प्रथमच कांस्यपदक जिंकत क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. या यशामध्ये एसएसटी महाविद्यालयाचे विद्यार्थी अजय खेडकर आणि शंतनू सुरवे यांनी उत्कृष्ट खेळ सादर करत मोलाचा वाटा उचलला.
बेसबॉलच्या आंतर विद्यापीठीय स्तरावर मुंबई विद्यापीठाला मिळालेले हे पहिलेच पदक असल्याने या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, शिस्त आणि संघभावना कौतुकास्पद ठरली. तर, एसएसटी महाविद्यालयाचे विद्यार्थी अजय खेडकर याची मुंबई विद्यापीठाच्या बेसबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. त्याच्या सक्षम नेतृत्वाखाली संघाने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक निश्चित केले. या उल्लेखनीय यशाबद्दल मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, प्राचार्य डॉ. पुरस्वानी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. राहुल अकुल आणि प्रा. पुष्कर पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच हे यश संपादन झाल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता IPL 2026 स्पर्धेवरही? १९ वा हंगाम पुढे ढकलला जाणार? अध्यक्षांनी दिले अपडेट्स

Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : NCERT पुस्तकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

Paduka Darshan Mumbai : मुंबईत दोनदिवसीय ‘भक्तीचा महाकुंभ’,‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे संत आणि सद्‍गुरू पादुकांच्या दर्शनाची संधी

SCROLL FOR NEXT