मुंबई

सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाची दयनीय अवस्था

CD

सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाची दयनीय अवस्था
खेळाडूंचा हक्क हिरावला जात असल्याचा आरोप; महापालिका प्रशासनाविरोधात संताप
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मैदानाच्या दुरवस्थेमुळे स्थानिक खेळाडू आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानाकडे महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
सानपाडा परिसरातील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाची कोणतीही प्रकारे नियमित देखभाल केली जात नसल्याने येथे सर्वत्र बकालपणा पसरलेला दिसून येतो. मैदानावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, कचरा व बांधकाम साहित्याचे ढीग आढळून येतात. त्यामुळे खेळाडूंना खेळासाठी आवश्यक असलेली सुरक्षित व स्वच्छ जागा मिळत नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे. या मैदानावर विविध राजकीय पक्ष, संस्था व सामाजिक कार्यक्रमांसाठी मोठमोठे मंडप उभारले जातात. कार्यक्रमानंतर मैदान पूर्ववत करण्याची कोणतीही जबाबदारी संबंधितांकडून घेतली जात नसल्याने मैदानाची अवस्था अधिकच खराब होत आहे. राजकीय दबावामुळे संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच, मैदानालगतच्या सोसायट्यांमधील रहिवासी येथे सर्रास वाहन पार्किंग करतात. दिवसरात्र उभ्या असलेल्या वाहनांमुळे मुलांना चक्‍क मैदानात खेळण्यास मज्जाव केला जात आहे. याशिवाय, मैदानाभोवती असलेला जॉगिंग ट्रॅकही स्वच्छतेअभावी कचऱ्याने भरलेला असून त्याची दुरवस्था झाली आहे.
..................
सुरक्षा भिंतीचे काम अर्धवट
मैदानाच्या पूर्वेकडील सुरक्षा भिंतीचे काम महापालिकेने हाती घेतले असले, तरी ते अनेक दिवसांपासून अर्धवट स्थितीत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून मैदान अतिक्रमणमुक्त करावे, स्वच्छता व देखभाल नियमित करावी तसेच मुलांना सुरक्षितपणे खेळण्यासाठी मैदान खुले करावे, अशी मागणी स्थानिक खेळाडू व नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT