मुंबई

केळवेत किल्ले विजय दिन साजरा

CD

केळवेत किल्ले विजय दिन साजरा
वज्रेश्वरी देवी पालखी मिरवणुकीतून इतिहासाचा जागर
पालघर, ता. ११ ः मराठा पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले विजय दिनानिमित्त केळवे माहीम येथे कुलस्वामिनी आई वज्रेश्वरी देवीची पालखी काढण्यात आली. शौर्य, श्रद्धा आणि इतिहास यांचे विलक्षण दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यामध्ये भाविक, शिवप्रेमी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वर्षीचा सोहळा किल्ले वसई मोहीम, संवर्धन मोहीम केळवे आणि शिवप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
सकाळी पालखीचे आगमन प्राचीन कालिकामाता मंदिरात झाले. तेथे वज्रेश्वरी देवी, कालिकामातेची विधिवत भेट घडवण्यात आली. इतिहास संशोधक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी मंदिराचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा उपस्थितांना सांगितला. मराठ्यांनी देवीला मान देऊन जवळच भवानगड किल्ल्याची उभारणी केली असून, मंदिर परिसरातील हनुमंत मूर्ती आणि शिलालेख अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर पालखी शीतलादेवी मंदिरात नेण्यात आली. तेथे भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाली. मिरवणूक केळवे बाजारातून मार्गक्रमण करीत पुढे केळवे झंजिरा किल्ल्याजवळ पोहोचली. तेथे मानाचा नारळ व भंडारा अर्पण करून पालखी मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
---------------------------
मराठ्यांच्या शौर्याचे स्मरण
अठराव्या शतकात नरवीर चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीज सत्तेचा पराभव करीत केळवे किल्ला स्वराज्यात सामील केला. या विजयाच्या पुढील टप्प्यात माहीम, तारापूर, डहाणू आणि अखेर वसई किल्ला स्वराज्यात आला. सुमारे वीस हजार हुतात्म्यांच्या बलिदानातून हा पराक्रम साध्य झाला. या तेजस्वी इतिहासाची स्मृती जपण्यासाठी दरवर्षी किल्ले विजय दिनानिमित्त हा उपक्रम होत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT