मुंबई

शगुन चौकच्या नामांतरासाठी उलवे नियोजन समितीचे आंदोलन

CD

शगुन चौकच्या नामांतरासाठी उलवे नियोजन समितीचे आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ उभारणीसह नाव देण्याची मागणी
उलवे, ता. ११ (बातमीदार) : उलवे सेक्टर १९ येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, तसेच बस तिकीटांवर व दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे ‘शगुन चौक’ हे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ करण्यात यावे, या मागणीसाठी उलवे नियोजन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवप्रेमी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
उलवे शहरातील नागरिक आणि शिवप्रेमी गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सेक्टर १९ येथील चौकात उभारावा, अशी मागणी सातत्याने करीत आहेत. तसेच ‘शगुन चौक’ या नावाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, असे नामकरण करावे, यासाठी सिडको प्रशासन व परिवहन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या आंदोलनादरम्यान बोलताना उलवे नियोजन समितीचे अध्यक्ष संतोष काटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही केवळ एक प्रतिकृती नसून तो आमच्या श्रद्धेचा, इतिहासाचा, अस्मितेचा आणि आस्थेचा अविभाज्य भाग आहे. शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्यासाठी आणि चौक नामांतरासाठी वारंवार मागणी करूनही जर सिडको प्रशासन व परिवहन विभाग लक्ष देत नसेल, तर आगामी काळात मोठ्या संख्येने सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रशासनाने तातडीने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT