वाणगावच्या हळदीची विदेशवारी
कोलवलीत उत्पादन, अमेरिका, दुबई, आयर्लंडमध्ये मागणी
वाणगाव, ता.१२ (बातमीदार)ः वाणगावजवळील कोलवलीतील सेंद्रिय खतांचा वापर केलेली हळद अमेरिका, दुबई, आयर्लंडमध्ये पाठवली जात आहे. त्यामुळे निसर्गाचा ढासळलेला समतोल, बदलते हवामान, पावसाचे अनिश्चित स्वरूपात शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांना महत्त्व आले आहे.
जिल्ह्यातील शेतकरी वर्ग हा आधुनिक विचारसरणीचा असल्याने शेतीत अनेक प्रयोग करत आहे. डहाणू तालुक्यातील वाणगाव जवळील कोलवली येथील प्रगतशील शेतकरी अनिल पाटील यांनी २० गुंठे क्षेत्रावर सेंद्रिय सेलम जातीच्या हळदीची लागवड केली आहे. गेल्या वर्षी ५०० किलो हळद पावडरची ३५० रुपये प्रति किलो दराने विक्री केली आहे. त्यातून खर्च वजा करता दीड लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला होता. तर आता एक एकर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. साधारणतः मार्च पर्यंत हळद परिपक्व होऊन काढणीस तयार होईल, असा अंदाज आहे.
-------------------------------------
पोषक वातावरण
पालघर जिल्ह्यातील हवामान हळदीच्या पिकासाठी अनुकूल आहे. उष्ण, दमट हवामान हळद पिकासाठी पोषक आहे. विशेषतः पावसाळा, त्यानंतरचा कोरडा ऋतू पिकासाठी फायदेशीर ठरतो. पालघरमध्ये तापमान साधारणपणे २० ते ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. जून ते सप्टेंबर पडणारा पाऊस हळदीच्या लागवडीसाठी महत्त्वाचा असतो. ऑक्टोबर ते मार्च काळात हवामान दमट असते. जे पीक काढणीसाठी योग्य असते.
-------------------------
आरोग्यदायी महत्त्व
प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात हळद अर्पण केली जाते. लग्न समारंभातही हळदीला आग्रहाचे स्थान आहे. हळद मसाला वर्गीय पिकातील महत्त्वाचे नगदी पीक असल्याने दैनंदिन आहारात देखील हळदीला विशेष महत्त्व आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी, मधुमेह, डायबिटीज, पॅरालिसीस कॅन्सर यासारख्या आजारांवर हळद प्रभावी ठरते.
-------------------------
लागवड क्षेत्र : एक एकर
बेणे जात : सेलम
ृअपेक्षित उत्पादन : १ हजार किलो
अपेक्षित भाव : किलोला ४००
एकूण खर्च : एकरी ५० हजार
निव्वळ नफा : अंदाजे ३.५ लाख
--------------------------------
सेंद्रिय पद्धतीच्या हळद निर्मितीतून ग्राहकांच्या आरोग्याला फायदा होत असल्याने वेगळे समाधान मिळत आहे. बाजारात दिवसेंदिवस हळदीची मागणी वाढत आहे. परंतु, कमी जागेत, कमी खर्चात, शाश्वत उत्पादन देणारे हळद पीक असल्याने शेतकऱ्यांनी चांगला नफा मिळवणे शक्य आहे.
- अनिल पाटील, हळद उत्पादक, कोलवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.