युवक दिनानिमित्त व्याख्यान
मोखाडा (बातमीदार) : मोखाड्यातील वीर तिलका माजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) युवक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रा. साहेबराव धनवटे यांनी स्वामी विवेकानंद जयंतीदिनी त्यांच्या जीवन आणि विचारांवर आधारित प्रेरणादायी व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, ध्येयवाद आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले आहे. आपल्या व्याख्यानात प्रा. धनवटे यांनी स्वामी विवेकानंद यांचा जीवनप्रवास, त्यांची वैचारिक जडणघडण, रामकृष्ण परमहंस यांचे मार्गदर्शन, तसेच शिकागो येथील ऐतिहासिक भाषण यांचा संदर्भ देत युवकांमध्ये आत्मसन्मान आणि आत्मविश्वास जागवण्याचे कार्य केले.
----------------------------------
कासा (बातमीदार) : ठाणे व पालघर जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तिचे संवर्धन व संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. वन विभागामार्फत आम्ही सातत्याने वनसंपत्तीची काळजी घेत असल्याचे प्रतिपादन कासा वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुजय कोळी यांनी व्यक्त केले. पालघर जिल्ह्यातील वारली, कातकरी, कोकणा, कोळी मल्हार इत्यादी आदिवासी जमातींचा वनाशी जन्मजात संबंध आहे. मोह, साग, खैर, पळस, बांबू, शिसव यासारख्या वृक्षांपासून त्यांचे जीवनमान चालते. गवतापासून टोपल्या व शोभेच्या वस्तू बनवून विक्री केल्या जातात. तसेच शासनामार्फत आदिवासी बचत गटांना प्रशिक्षण व मदतही दिली जाते. मात्र वेगाने होत असलेले शहरीकरण व मानवी हस्तक्षेपामुळे वनसंपदा धोक्यात येत असून याला आळा घालण्यासाठी शासनासोबतच समाजानेही जागरूक होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी कोळी यांनी व्यक्त केले.
---------------------------------
दिंडी सोहळ्याचे आयोजन
विक्रमगड (बातमीदार) : पौष वारी निमित्त विक्रमगड तालूक्यातील विठ्ठल-रखुमाई मंदिर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर असे पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही ७ ते १५ जानेवारी या कालावधीत या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून अनेक वारकरींनी यात सहभाग घेतला आहे. दिंडी सोहळ्यादरम्यान भजन, हरिपाठ, प्रवचन, किर्तन इत्यादी विविध कार्यक्रमही होणार आहेत. या दिंडीत सहभागी होत, भावभक्तीने सेवा करण्यासह परमार्थिक जीवन कृत्य करावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते. या दिंडीमध्ये चोपदार, विणेकरी, तुळसधारी महिला, आचारी, आचारी मदतणीस, मृदुंगचार्य, भजन मंडळी, गायनाचार्य, सल्लागार, स्वयंसेवक व पालखी चालक यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.