भिवंडी अध्यक्षाने राजीनामा दिल्याने एमआयएमला धक्का
भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडीत सत्ताधारी आणि विरोधकांच्या उमेदवारीला आव्हान देत महापालिकेच्या या निवडणुकीत बंडखोरांनी रण माजविले असताना निवडणुकीच्या मैदानातून एआयएमआयएम अध्यक्ष शादाब उस्मानी यांनी अचानक राजीनामा देऊन एमआयएम पक्षाला धक्का दिला आहे. सध्या सुरू असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत एआयएमआयएमने एकूण १६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एक आणि पूर्व विधानसभा मतदारसंघातील १५ जागा आहेत. भिवंडी अध्यक्षांच्या अचानक दिलेल्या त्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे आणि याचा थेट परिणाम भिवंडीमध्ये पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक निकालांवर होऊ शकतो.
एआयएमआयएमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना शादाब उस्मानी यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की गेल्या १२ वर्षांपासून ते एआयएमआयएम भिवंडी संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मजलिसची विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. त्यासाठी एआयएमआयएम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांकडून कधीही पाठिंबा मिळाला नाही. ज्यामुळे संघटनेची ताकद आणि सामूहिक नेतृत्व गंभीरपणे खराब होत आहे. माझ्या अनुभव आणि निरीक्षणाच्या आधारे, त्यांची कार्यशैली संघटनात्मक नेत्यासाठी आवश्यक असलेली जबाबदारी आणि संतुलन प्रतिबिंबित करत नाही. त्यामुळे मी एआयएमआयएम पक्षाचा राजीनामा देत आहे, असे नमूद केले आहे.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील समाजवादीचे क्रियाशील आमदार रईस शेख यांचा करिष्मा या निवडणुकीत दिसणार असून त्यांच्या या करिष्म्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत भिवंडी पूर्व विधानसभा भागात मोठ्या संख्येने काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार आहेत, अशी चर्चा शहरात सुरु आहे. या पूर्व विधानसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाने पतंग निशाणीवर १५ उमेदवार उभे केले आहे. असे असताना अचानकपणे एमआयएमच्या भिवंडी अध्यक्षाने वरिष्ठांवर आरोप करीत राजीनामा देणे हा मनपा निवडणुकीतील राजकारणाचा भाग असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून या घटनेमुळे शहरातील प्रामाणिक एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर निवडणुकीपूर्वी होत असलेल्या या घडामोडीमुळे भिवंडी महापालिका निवडणुका आणखी रंजक बनत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.