मुंबई

वाड्यात भाजपचा उपनगराध्यक्ष

CD

वाड्यात भाजपचा उपनगराध्यक्ष
मनिष देहेरकर यांची बिनविरोध निवड
वाडा, ता.१२ (बातमीदार)ः वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपचे मनिष देहेरकर यांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीच्या सुचिता पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
वाडा नगरपंचायतीत भाजपचे ११ शिवसेना शिंदे गट ३, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असे प्रत्येकी एक नगरसेवक आहे त्यामुळे भाजप करिता ही निवडणूक एकतर्फीच होणार होती. पंरतु, महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज माघारी गेल्याने निवडणूक बिनविरोध झाली. तर स्वीकृत नगरसेवकांकरिता दोन पदे मंजूर होती. भाजपच्या गटाकडून एक स्वीकृत नगरसेवक बसत होता. भाजपचे माजी शहरप्रमुख हर्षल खांबेकर यांची नियुक्ती करण्यात आली तर दुसऱ्या जागेसाठी भाजपने शिंदे गटाच्या कोट्यातून भाजपा कार्यकर्ता शुभांगी उत्तेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर महाविकास आघाडीच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे गटाकडून दाखल केलेल्या शुभांगी उत्तेकर यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरल्याने पाटील विजयी झाले.
------------------------
मविआचा जल्लोष
महाविकास आघाडी म्हणून नगरपंचायतीत अवघे तीन नगरसेवक निवडून आलेले असताना स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विराज पाटील विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत वाडा शहरातून मिरवणूक काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nutritionist Health Tips: तुम्हाला 35 वर्षानंतरही राहायचंय फिट आणि निरोगी? न्यूट्रिशनिस्टच्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

SCROLL FOR NEXT