छोट्या पक्षांची विचारांची लढत
डिजिटल बॅनरच्या गर्दीत काळ्या-पांढऱ्या हॅण्डबिलची हाक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : सध्या निवडणूक लढवायची म्हटलं की पैशाचा वारेमाप वापर, गाड्या-घोड्यांचा लवाजमा आणि झगमगाट हवाच असे आहे. पैसा नसेल तर निवडणूक तिकीट मिळणेही दुरापस्त झाले आहे. या परिस्थितीमध्येही केवळ विचार जिवंत ठेवण्यासाठी माकप, शेकाप, जनता दल असे छोटे पक्ष मोजक्या उमेदवारांच्या मदतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रचारासाठी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी नसली तरी उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करीत असल्याचे चित्र आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात २२७ जागांसाठी १,७०० उमेदवार आहेत. त्यामध्ये शिवसेना (ठाकरे), मनसे, भाजप, शिवसेना (शिंदे), काँग्रेस या प्रमुख पक्षांसह अपक्षांची ५५१ एवढी मोठी संख्या आहे. निवडणूक विभागाने उमेदवारी चिन्ह जारी केल्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे; मात्र भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर या पक्षांनी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून त्यांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. संबंधित उमेदवार कोणी धनदांडगे नसून सर्वसामान्य कामगार, नोकरदार असून ते घराघरात जाऊन प्रचार करत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शेकापचे नेते राजू कोरडे यांनी सांगितले.
पदरमोड करून प्रचार
सध्या मतदारसंघात आपण वरचढ आहोत, हे दाखवण्यासाठी अनेकांकडून डिजिटल बॅनर, टोलेजंग होर्डिंग, एलईडी लाइटचा वापर करून प्रचार केला जात आहे; मात्र शेकाप, भाकप, जनता दलाकडून अत्यंत पारंपरिक पद्धतीने प्रचार केला जात असून त्यांच्याकडून काळी-पांढरी साधी हॅण्डबिल वितरित केली जात आहेत. कार्यकर्ते पदरमोड करून करून घरोघर प्रचार करत असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.
कोण कुठे लढते?
सीपीआय
- प्रभाग क्रमांक २६ - विलास रोहिमल
- प्रभाग क्र. ४८ - ॲड. सईद शेरिफुद्दीन शेख
- प्रभाग क्र. १४१ - सुनील कदम
- प्रभाग क्र. १७३ - कविता निकाळजे
- प्रभाग क्र. १८५ - ॲड. स्वाती कुंचीकोरवे
शेकाप
- प्रभाग क्र. १८७ - ॲड. साम्या कोरडे
- प्रभाग क्र. १८८ - दानियल फारूखी
- प्रभाग क्र. १७४ - यास्मीन खान
जनता दल सेक्युलर
- प्रभाग क्र. ११० - प्रिया संजीव कमार
- प्रभाग क्र. १२५ - संकेत आहिरे
- प्रभाग क्र. १३५ - नीरज राठोड
- प्रभाग क्र. २११ - डाॅ. मोहम्मद शेख
- प्रभाग क्र. २२७ - सुषमा साळवी
आम्ही कामगार शक्तीच्या माध्यमातून मुंबई घडवली आहे. आज आम्ही संख्येने कमी असलो तरी लढत राहू. ही अस्तित्वाची लढाई आहे. निकराने लढा न दिल्यास कामगारांची मुंबई भांडवलदारांची होईल.
- प्रकाश रेड्डी, नेते, सीपीआय
मुंबईत आम्ही जिंकू शकू, अशा पाच ठिकाणी उमेदवार दिले आहेत. संसाधनाच्या बाबतीत आम्ही काहीसे कमी पडत असलो तरी कार्यकर्त्यांचे मनोबल आणि ताकदीवर लढत आहोत.
- प्रभाकर नारकर,
मुंबई अध्यक्ष, जनता दल सेक्युलर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.