मुंबई

बदलापूरमध्ये संतवाणीचा जागर

CD

बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : अंबरनाथ तालुका आध्यात्मिक उत्सव समितीच्या वतीने आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली २३ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या ‘राष्ट्रीय कीर्तन महोत्सव २०२६’ची बदलापूर शहरात भक्तिमय वातावरणात उत्साहात सांगता झाली. वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेचा वारसा जपत सातदिवसीय महोत्सवामुळे संपूर्ण बदलापूरनगरी भक्ती, नामस्मरण आणि संतविचारांनी भारावून गेली होती.
महोत्सवाची सुरुवात विघ्नहर्ता श्री गणरायाची विधिवत पूजा-अर्चा, टाळ, वीणा व मृदंग पूजनाने झाली. पहिल्याच दिवशी पैठण येथील श्रीनाथ संस्थानाधिपती, संत एकनाथ महाराजांचे १४वे वंशज व उत्तराधिकारी ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांच्या सुश्राव्य व भावस्पर्शी कीर्तनाने भक्तिरसाचा ओघ सुरू झाला. त्यांच्या प्रभावी वाणीतून संतविचारांचे मोलाचे चिंतन घडले. महोत्सवाच्या सातव्या दिवशी शनिवारी २०० मृदंग वादकांच्या एकत्रित सादरीकरणाने हरिपाठाचा जयघोष संपूर्ण परिसरात निनादला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेला दीपोत्सव हा सोहळा नेत्रदीपक ठरला. याचवेळी पंढरपूर येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. भानुदास महाराज चातुरमासे यांनी विठ्ठल नामाची महती सांगत ‘विठ्ठल नामस्मरणातून प्रत्येक कार्य सुख-समाधान देणारे ठरते’, असा संदेश दिला.

दिंडीनंतर मांगरूळ येथील ह.भ.प. वासुदेव महाराज पाटील यांच्या रसाळ काल्याच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. यावेळी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्ष प्रियांका दामले तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या काल्याच्या महाप्रसादाने या भक्ती सोहळ्याची सांगता झाली. हा महोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता वारकरी संस्कृती, सामाजिक एकात्मता आणि जनसामान्यांच्या श्रद्धेचे प्रतीक ठरल्याची भावना आमदार किसन कथोरे यांनी यावेळी व्यक्त केली.

दिंडी सोहळा
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी गणेश चौक, मांजर्ली येथून महोत्सव स्थळापर्यंत पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी वारकरी वेश परिधान केला होता, तर काहींनी विठ्ठल-रखुमाईची वेशभूषा साकारली होती. टाळ–मृदंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषाने संपूर्ण बदलापूरनगरी दुमदुमून गेली. महिलांनी फुगडीचा फेर धरत दिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT