पनवेल हे महाराष्ट्राचे नवे ग्रोथ इंजिन (सुधारित)
तिसऱ्या मुंबईच्या उभारणीत महापालिकेची निर्णायक भूमिका
पनवेल, ता. १२ (बातमीदार) : रायगड आणि ठाणे या दोन जिल्ह्यांना जोडणारी पनवेल महापालिका ही केवळ प्रशासकीय यंत्रणा न राहता, भविष्यातील ‘तिसऱ्या मुंबई’ची प्रवेशद्वार ठरत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प आणि पनवेल महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांमुळे हा संपूर्ण परिसर महाराष्ट्राच्या विकासाचा नवा ग्रोथ इंजिन ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पनवेल महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी (ता.१२) कळंबोली येथे अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी फडणवीस यांची प्रकट मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये प्रश्नांची उत्तरे देताना फडणवीस यांनी आगामी पाच वर्षांत पनवेलकरांना कायापालट होताना पाहायची संधी मिळणार असल्याचे सांगितले.
पनवेल महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी (ता. १२) कळंबोली येथे अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये प्रश्नांची उत्तरे देताना फडणवीस यांनी आगामी पाच वर्षांत पनवेलकरांना कायापालट होताना पाहायची संधी मिळणार असल्याचे सांगितले. या संवाद मेळाव्यास परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी सूत्रसंचालन व संवादाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विकासकामे, नागरी समस्या, पाणीपुरवठा तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासंदर्भात थेट प्रश्न उपस्थित केले. विमानतळाच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले, की ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, विमानतळाभोवती नैना प्रकल्पाच्या माध्यमातून नियोजित शहर उभे राहत असून, एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडि-सिटी विकसित केली जात आहे. एज्यु-सिटीमध्ये १२ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा समावेश असून, त्यापैकी सात विद्यापीठांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ मिळाले आहेत, तर उर्वरित पाच संस्थांशी चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.’ दरम्यान, पनवेल महापालिका क्षेत्राला शिलार धरणातून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील फाईल गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती; मात्र आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
...
विमानतळासाठी दोन स्वतंत्र जोड रस्ते
पनवेलमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पनवेल येथे होत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती फडणवीस यांनी दिली. उत्तर-दक्षिण वाहतुकीमुळे होणारी कोंडी कमी करण्यासाठी दिल्ली-बडोदा महामार्ग, कळंबोली जंक्शनचा विकास, तुर्भे-खारघर बोगदा आणि विमानतळासाठी दोन स्वतंत्र जोड रस्ते विकसित करण्यात येत आहेत. यासाठी सुमारे ७५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. सिडकोमार्फत नवी मुंबई आणि पनवेलमध्ये ५९ किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारले जात असून, बेलापूर ते पेंधर, नवी मुंबई विमानतळ ते मुंबई विमानतळ, नेरूळ, उरण, तळोजा, कल्याण आणि पनवेल हे सर्व भाग मेट्रोने जोडले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अटल सेतूचा टोल कमी होणार नाही!
उलवे आणि उरण कोस्टल रोडमुळे विमानतळ व जेएनपीएकडे जाणारी वाहतूक अडथळामुक्त होणार आहे. अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई-नवी मुंबई अंतर कमी झाले असून, हा प्रकल्प टोलवर आधारित असला तरी ठरवलेल्या दरांपेक्षा २५ टक्के कमी टोल आकारला जात आहे. हे सेतू तयार करण्यासाठी जे कर्ज घेतले आहे ते कर्ज टोलच्या पैशांतून फेडण्यात येणार आहे. त्यामुळे अटलवरील टोलमुक्ती शक्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कोविडकाळात सूट देणारी पहिली महापालिका
कोविडकाळात पनवेल महापालिकेने मालमत्ता करावरील दंडात तब्बल ९० टक्के सूट देत राज्यातील पहिली महापालिका होण्याचा मान मिळवला. भुयारी गटारे, रस्ते, पाणीपुरवठा, उद्याने, महापालिका मुख्यालय अशी अनेक कामे एकाच वेळी सुरू असून, ‘पनवेलचा ३६० अंश विकास’ प्रत्यक्षात उतरवला जात आहे.
भाषणांऐवजी विकासावर थेट संवाद!
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांवर आधारित असा थेट संवाद हा एक वेगळा आणि प्रभावी प्रयोग ठरल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे. नेहमीच्या राजकीय भाषणांपेक्षा दृष्टिकोन, नियोजन आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून साधलेला संवाद अधिक परिणामकारक ठरल्याचे उपस्थित सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पनवेलचा चौफेर विकास करून सर्व लृूलभूत सुविधा व नागरी सेवा सक्षमपणे पुरवण्यात येतील, असा ठाम विश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संवादाला पूर्णविराम दिला.
ताजमहाल देण्याचेही करारनामा देतील!
पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मालमत्ता कराबाबतचे गॅरंटी कार्ड’ आणि ‘शपथेवरचा हमीनामा’ सादर करत सत्ताधारी महायुतीला थेट आव्हान दिले होते. त्यावर ‘जे सत्तेतच येणार नाहीत, त्यांनी काहीही लिहून दिले तरी पनवेलकर या भूलथापांना बळी पडणार नाहीत. उद्या ते ताजमहाल आणि मोटार गाडी देण्याचीही स्टॅम्प पेपरवर हमी देतील, ते शक्य आहे का?, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.