शिवाजी पार्कमध्ये
‘जय श्रीराम’च्या घोषणा
महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रविवारी ठाकरे बंधूंची सभा झाल्यानंतर, आज महायुतीची सभा झाली. या सभेनिमित्त भाजप, शिवसेना, रिपाइंने जोरदार शक्तिप्रर्शन केले. ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी शिवाजी पार्कचा परिसर दणाणून गेला.
महायुतीच्या सभेसाठी दुपारपासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे शिवाजी पार्कवर धडकत होते. महायुतीच्या कार्यकत्यांचा भर ‘जय श्रीराम’, ‘बटेंगे तो कटेंगे’, आदी घोषणांवर अधिक असल्याचे दिसून आले. या सभेसाठी हिंदू संघटनांचाही सहभाग लक्षणीय होता. या सभेसाठी स्थानिक मराठी कार्यकर्त्यांपेक्षा उत्तर भारतीय कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. मोठ्या संख्येने हिंदी भाषिक सभास्थळी दाखल झाले होते. मुंबईच्या शेजारील गाव-खेड्यांतून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणण्यासाठी महायुतीने खासगी बसेसची व्यवस्था केली होती. ठाकरे बंधूंच्या सभेला तोडीस तोड गर्दी जमविण्याचा महायुतीने प्रयत्न केला.
----
हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी ही निवडणुक आहे. शिवाजी पार्कमध्ये ‘जय श्रीराम’चा गजर ऐकून प्रचंड उत्साह मिळाला. मुंबईत भाजप मजबूत होण्यासाठी मी बिहारमधून आलो आहे.
- विजय झा, बिहार
---
महायुतीची एकत्र सभा असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनीच मुंबईत सत्ता येईल.
- राधेश्याम सिंग, अंधेरी