मुंबई

सोनगाव येथे स्वच्छता मोहीम उत्साहात

CD

सोनगाव येथे स्वच्छता मोहीम उत्साहात
रोहा, ता. १३ (बातमीदार) : स्वच्छ भारत-सुंदर भारत अभियान अंतर्गत सोनगाव ग्राम परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सुदर्शन केमिकल लिमिटेड, रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सोनगाव आणि ग्रुप ग्रामपंचायत मढाली खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
शाळेपासून गावापर्यंत स्वच्छता रॅली काढून विद्यार्थी व ग्रामस्थांनी परिसर स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर गावातील सुक्या कचऱ्याचे संकलन व त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय राहिला.
याप्रसंगी सुदर्शन केमिकल सीएसआरचे प्रतिनिधी संग्राम पाटील, सुदर्शन क्लॅरिएंट सीएसआरचे प्रतिनिधी पराग फुकणे व सुनील दळवी, ग्रामसेविका प्रतीक्षा कांबळे, मुख्याध्यापक संतोष धोत्रे, शिक्षक ब्रिजेश भादेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भोईर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
स्वच्छता, शिस्त आणि सार्वजनिक आरोग्य याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा हेतू असून, ग्रामस्थांकडून यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

फोटो कॅप्शन : सानेगाव येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले सुदर्शन कंपनी अधिकारी व ग्रामस्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

Daund Crime : पोलीस ठाण्यासमोरच राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला तुडविले; दौंडमध्ये कायद्याचा धाक संपला?

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

Latest Marathi News Live Update : आम्ही नरेश अरोरा यांच्या पाठिशी; कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT