मुंबई

विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे

CD

विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे
नवनिर्वाचित नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांचे प्रतिपादन
मुरूड, ता. १३ (बातमीदार) : राष्ट्रमाता जिजाऊ यांचे आदर्श मातृत्व, दूरदृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांतून मिळणारी मूल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन मुरूडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी केले.
कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित स्त्री शक्तीचा सन्मान व अभिवादन सोहळा या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दांडेकर म्हणाल्या की, आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असले तरी सामाजिक जाणिवा, राष्ट्रभक्ती, नैतिक मूल्ये आणि जबाबदारीची भावना तितकीच आवश्यक आहे. समाजातील प्रश्न समजून घेऊन त्यावर सकारात्मक उपाय शोधणारी तरुण पिढीच सक्षम भारत घडवू शकते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या वासंती उमरोटकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्षा आराधना दांडेकर तसेच नगरसेवकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे यांनी आपल्या मनोगतातून स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. शिक्षणासोबत चारित्र्यनिर्मिती, आत्मविश्वास आणि समाजसेवेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज शिक्षणाचा मार्ग सर्वांसाठी खुला झाला, हे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमात माजी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, डॉ. श्रीशैल बहिरगुडे, डॉ. सुभाष म्हात्रे, डॉ. नारायण बागुल, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या वासंती उमरोटकर यांचेही मार्गदर्शन लाभले. या वेळी नगरसेविका प्रांजली मकू, प्रमिला माळी, देवयानी गुरव, प्रीता चौलकर, श्रद्धा अपराधे, ॲड. मृणाल खोत, तरन्नूम फराश आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : "होय, मी बाजीरावच!" फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे जशास तसे उत्तर; मोफत मेट्रोच्या आश्वासनावर ठाम!

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

Devendra Fadnavis : "अजित दादांनी शब्द पाळला नाही"; पुण्याच्या मैत्रिपूर्ण लढतीवरून देवेंद्र फडणवीसांची उघड नाराजी!

मोठी बातमी! प्रचार तोफा थंडावताच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा, कारण काय?

Thane News: ठाणे पालिका निवडणूक यंत्रणा सज्ज! १६ लाख मतदार बजावणार हक्क; दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय

SCROLL FOR NEXT