मुंबई

मतदानाच्या दिवशी शाहीप्रवास

CD

मतदानाच्या दिवशी शाही प्रवास
मिरा-भाईंदर पालिकेकडून बसभाड्यात सवलत
भाईंदर, ता.१३ (बातमीदार) : मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी महापालिका स्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने मिरा-भाईंदर पालिकेने मतदानाच्या दिवशी मतदारांना बसभाड्यात १० ते २० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका निवडणुकीतील मतदानाची तयारी महापालिकेने पूर्ण केली आहे. १८० ठिकाणी ९५७ केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी एकही मतदान केंद्रे संवेदनशील नाहीत. सात ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाचप्रमाणे १,०५४ मतदान केंद्राध्यक्ष, ३,१६२ मतदान अधिकारी, १,०५४ शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी १८४ बसची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पालिकेने परिवहन सेवेच्या बसभाड्यात १० ते २० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी शहरातील हॉटेल, मिठाई विक्रेते यांनाही मतदान करणाऱ्यांना सवलत देण्याचे आवाहन केले आहे.
----------------------------------------
यंत्रणा सज्ज
प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. त्याचप्रमाणे ८५ वर्षांहून अधिक तसेच गंभीर आजारी रुग्णांना मतदानासाठी सहाय्यक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अग्निशमन यंत्रणा, प्रत्येक मतदान केंद्रात अग्निशमन संयंत्र, रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक तैनात असणार आहेत. याशिवाय मतदारांना क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
-------------------------
मतमोजणीची तयारी पूर्ण
निवडणुकीसाठी १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सात ठिकाणी मतमोजणी केली जाणार असून, प्रत्येक मतमोजणी केंद्रात मतमोजणीचे १४ टेबल असणार आहेत. मतमोजणी केंद्र व मतमोजणी यंत्रासाठी असलेल्या स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा सज्ज करण्यात आली असून, स्ट्राँग रूमला दोन कुलुपे लावली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

Daund Crime : पोलीस ठाण्यासमोरच राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला तुडविले; दौंडमध्ये कायद्याचा धाक संपला?

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

Latest Marathi News Live Update : आम्ही नरेश अरोरा यांच्या पाठिशी; कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT