मुंबई

निवडणुकीच्या धामधूमीत पतंगबाजीची चढाओढ

CD

निवडणुकीच्या धामधुमीत पतंगबाजीची चढाओढ
वसई नगरीत मकर संक्रांतीचा उत्साह
वसई, ता. १३ (बातमीदार)ः वसई-विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाबरोबर विविध पक्ष एकीकडे सज्ज झाले आहेत, तर दुसरीकडे मकर संक्रांत सणाचा गोडवा साजरा करण्यासाठी पतंगबाजांमध्येदेखील स्पर्धा लागली आहे.
तीळगूळ, साखरफुटाणे वाटप तसेच अनेक गृहसंकुलात हळदी-कुंकू समारंभ होणार आहेत. महिला वाण देऊन मकर संक्रांतीचा आनंद साजरा करणार आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक रंगीबेरंगी पतंग उडवण्यासाठी उत्सुक असल्याने बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. वसई, नालासोपारा, विरार, नायगाव, वसई गाव येथे निवडणुकीची धामधूम सुरू असताना मकर संक्रांतीसाठीच्या साहित्यविक्री तसेच पतंग खरेदीला तेजी आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
------------------------------
कार्टून, नक्षीदार पतंगांना पसंती
- वसई-विरार शहरात जोधपूर, अहमदाबाद, राजस्थान, मथुरा येथील पतंग विक्रीसाठी आले आहेत. बाजारात कार्टून, नक्षीदार, विविधरंगी पतंग दिसून येत असून, २० पासून ते १०० रुपयांपर्यंत तर मांजा २०० ते ५०० रुपयांना विकला जात आहे.
- पतंगाचा आनंद जरी नागरिक घेत असले तरी त्यामुळे पशुपक्षी जखमी होत असतात. पायी चालणारे किंवा दुचाकीस्वारांनादेखील इजा होत असते. त्यामुळे मांजामुळे पशुपक्ष्यांना इजा टाळण्यासाठी पक्षीप्रेमी सज्ज झाले आहेत.
---------------------------
कोणाची पतंग कापणार?
वसई नगरीतील विविध भागातील मंदिरात देवदर्शनासाठी नागरिकांची गर्दी होणार आहे. सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक वसई विरार येथील समुद्रकिनारी भटकंतीसाठी बाहेर निघणार आहेत, तर गुरुवारी (ता. १५) मतदान होणार असल्याने मतदारराजा कोणाला पसंती देणार आणि कोणाची पतंग कापणार याचीदेखील चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT