मुंबई

चार मतं, चार रंग

CD

चार मतं, चार रंग
मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी नवी पद्धत
उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर) : महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी (ता. १५) मतदान होत असून, चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे मतदारांना अ, ब, क आणि ड अशा चार प्रतिनिधींना स्वतंत्रपणे मतदान करायचे आहे. या प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये आणि मतदान अधिक सोपे, स्पष्ट व सुलभ व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने चार वेगवेगळ्या रंगांची मतदान यंत्रे वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.

नव्या रंगपद्धतीनुसार ‘अ’ जागेसाठी पांढरा रंग, ‘ब’ साठी फिका गुलाबी रंग, ‘क’ साठी फिका पिवळा रंग आणि ‘ड’ साठी फिका निळ्या रंगाचे मतदान यंत्र ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक यंत्रावर त्या-त्या जागेतील उमेदवारांची नावे व निवडणूक चिन्हे स्पष्टपणे छापलेली असतील. त्यामुळे मतदारांना प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र आणि अचूक मतदान करता येणार आहे. चार सदस्यांना मतदान करताना संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी मतदान केंद्रांवर मार्गदर्शक सूचना फलक, स्वयंसेवकांची नेमणूक तसेच मतदान कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे मतदारांना मतदान प्रक्रियेदरम्यान योग्य मार्गदर्शन मिळणार असून, प्रत्येक मत अचूकपणे नोंदवले जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि मतदारांचा आत्मविश्वास वाढवणे या उद्देशाने ही रंगपद्धत उपयुक्त ठरणार असल्याची माहिती मनीषा आव्हाळे यांनी दिली. यासोबतच मतदारांमध्ये जनजागृतीसाठी विविध माध्यमांतून माहिती प्रसारित केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. चार रंग, चार मतदान यंत्रे आणि स्पष्ट मार्गदर्शन या नव्या व्यवस्थेमुळे उल्हासनगरमधील मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि मतदारस्नेही ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

“उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे मतदारांना चार स्वतंत्र मते द्यावी लागणार आहेत. ही प्रक्रिया मतदारांसाठी अधिक सुलभ, स्पष्ट आणि गोंधळरहित व्हावी, यासाठी प्रत्येक जागेसाठी वेगवेगळ्या रंगाची मतदान यंत्रे देण्याचा निर्णय घेतला आहे. रंगांमुळे मतदारांना योग्य जागेसाठी मतदान करताना सहज ओळख पटेल आणि प्रत्येक मत अचूकपणे नोंदवले जाईल. मतदान केंद्रांवर मार्गदर्शक फलक, स्वयंसेवक आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

विदर्भात काळीज पिळवटणारी घटना! कडाक्याच्या थंडीत काळ्या बॅगमध्ये आढळली ८ दिवसांची चिमुकली, आई वडिलांचा शोध सुरु

Video: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांने इतका जोरात सिक्स मारला की CSK च्या फॅनच्या गालाला झालं फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update : रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT