मुंबई

ठाणे पालिका निवडणूक यंत्रणा सज्ज

CD

१६ लाख मतदार बजावणार हक्क
११ सखी, आदर्श केंद्रांची उभारणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणे महापालिकेच्या १३१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सायंकाळी प्रचार थंडावल्यानंतर आता प्रशासन निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झाले असून, शहरातील दोन हजार १३ मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ११ सखी मतदान केंद्रे (पिंक बूथ) आणि पर्यावरणाचा संदेश देणारी ११ आदर्श केंद्रे उभारण्यात आली आहेत.

ठाणे पालिकेच्या ३३ प्रभागांमधील एकूण १६ लाख ४९ हजार ८६९ मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. मतदानासाठी १२,६५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे दोन टप्प्यांतील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. ७,०६८ कंट्रोल युनिट आणि ३,५०० बॅलेट युनिट्स सज्ज ठेवण्यात आली आहेत. ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी भारत इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनचे तंत्रज्ञही तैनात आहेत. तसेच दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची स्वतंत्र सोय केंद्रांवर उपलब्ध असेल. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहेत. मतदान केंद्रावरील कामकाजाकरिता मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान केंद्र अधिकारी व शिपाई यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांची दोन प्रशिक्षणे पूर्ण झाली असून, २० टक्के राखीव असे मिळून १२ हजार ६५० अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आले.

सीसीटीव्हीची नजर
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठा वापर करण्यात आला आहे. स्ट्राँग रूम, ईव्हीएम कमिशनिंग आणि चेक पोस्टवर ६४८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. शहरातील ३०५ संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्रांवर ७०१ कॅमेऱ्यांद्वारे थेट लक्ष ठेवले जाणार आहे.

दुबार मतदारांसाठी ‘हमीपत्र’ अनिवार्य
निवडणुकीपूर्वी दुबार मतदारांचा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला होता. पालिकेच्या तपासणीत १६,५४७ दुबार मतदार आढळले आहेत. या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी प्रशासनाकडे हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे.

मतदारांसाठी महत्त्वाचे
१ ते २८ आणि ३० ते ३३ या प्रभागांतील मतदारांना अ, ब, क, ड अशा चार जागांसाठी, तर प्रभाग क्र. २९ मधील मतदारांना तीन जागांसाठी मतदान करायचे आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी क्षेत्रीय अधिकारी आणि मास्टर ट्रेनर कार्यरत आहेत. सुरक्षिततेसाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे ठाणे महापालिका निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT