राष्ट्रनिर्मितीसाठी झटणाऱ्या तरुणांचा गौरव
देशभरातील १५ समाजसेवकांचा यंगिस्तान फाउंडेशनकडून सन्मान
कल्याण, ता. १४ (वार्ताहर) : यंगिस्तान फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा ‘प्राइड ऑफ यंग हिंदुस्तान पुरस्कार’ सोहळा विठ्ठलवाडी येथील वेदांता कॉलेज येथे पार पडला. या प्रसंगी देशातील विविध राज्यांमध्ये समाजसेवा, जनहित व राष्ट्रनिर्मिती या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ युवा समाजसेवकांचा गौरव करण्यात आला.
यंगिस्तान फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष मिथिलेश झा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेजर पवन कुमार थपलियाल यांची उपस्थिती लाभली. तर प्राचार्य डॉ. प्रशांत मधुकर शिंदे विशेष पाहुणे म्हणून कार्यक्रमाची उपस्थित होते. देशभरातून निवडलेल्या समाजसेवकांमध्ये दिव्यश्री पोलिमेरा (आंध्र प्रदेश), अक्षय कुमार (उत्तर प्रदेश), विदुषी अवस्थी (चंदीगड), अर्जुन सिंग (छत्तीसगड), वंगापल्ली मणी साई वर्मा (तेलंगणा), आशीष कुमार (हरियाणा), कृष्ण दत्त (हिमाचल प्रदेश), राणी राज (झारखंड), अभिषेक पंवार (मध्य प्रदेश), भारत पवार (महाराष्ट्र), मोहित शर्मा (उत्तर प्रदेश), हीरा लाल महावर (राजस्थान), डिल्लू सिंग (बिहार) आणि निरीक्षक राजन राम कानोजिया (महाराष्ट्र) यांचा समावेश होता.
या प्रसंगी वक्त्यांनी सांगितले की, हा पुरस्कार केवळ ट्रॉफी किंवा प्रमाणपत्र नसून, समाजासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या समाजसेवकांप्रती कृतज्ञता, सन्मान आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. समाजसेवक म्हणून समाजाकडून सन्मान व समजून घेण्याची अपेक्षा करत असताना, आपलीही जबाबदारी आहे की आपण इतरांच्या चांगल्या कार्याची दखल घ्यावी, त्यांचा सन्मान करावा आणि त्यांना पुढे जाण्यास प्रेरित करावे, असा संदेशही देण्यात आला.
या कार्यक्रमाला अयाची नगर युवा संघटन अध्यक्ष विक्की मंडल, संगीता हेगडे, जयश्री परिवार संस्थापक मुकुल पाटील आणि कन्यादान फाउंडेशनचे संस्थापक ऋषी सरदाना यांनी पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. याशिवाय कृष्णा झा, पंकज झा, धर्मेंद्र झा, अभिनाश पाटील आणि प्रेमचंद्र झा नी हजेरी लावली होती. रोशन झा, अंकित मिश्रा, शुभम गुप्ता, प्रतीक्षा सालियान, शिखा सिंग लुबाना, तेजस नाईक, बृजेश आणि इंद्रजीत ठाकुर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.