मुंबई

पुरवठा विभागाचा उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात

CD

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : खासगी व्यक्तीच्या मध्यस्थीने व्यावसायिकांकडून पाच लाखांची लाच घेणाऱ्या कोकण भवन येथील पुरवठा विभागाचे उपायुक्त अनिल टाकसाळे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (ता. १२) सायंकाळी अटक केली. त्यांना लाच घेण्यात मध्यस्थी करणारे साई प्रितम माधव अमिन आणि राजा गणेश थेवर या खासगी व्यक्तींनाही पथकाने अटक केली आहे. एसीबीने तिघांविरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे नवी मुंबईतील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

तक्रारदार एका ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून तांदूळ विक्रीचा व्यवसाय करतात. पुरवठा विभागाच्या पथकाने ३० डिसेंबरला तक्रारदारांच्या गोदामावर छापा टाकून अवैध तांदूळ साठा आढळल्याचा दावा करत तक्रारदार व त्यांच्या दोन भागीदारांविरोधात भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मदत करण्यासाठी, व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी, तसेच भविष्यात कारवाई न करण्यासाठी पुरवठा विभागाचे उपायुक्त अनिल टाकसाळे यांनी खासगी व्यक्ती अमिन याच्यामार्फत पाच लाख रुपये आणि दरमहा दोन लाखांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने ५ जानेवारीला एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.

एसीबी ठाणेच्या पथकाने पडताळणी केली असता, टाकसाळे यांनी तडजोडीअंती पाच लाख आणि दरमहा दीड लाख लाच घेण्याची कबुली खासगी व्यक्तीमार्फत दिली. त्यानुसार सोमवारी दुपारी एसीबीच्या पथकाने सीबीडी बेलापूर येथील लक्ष्मी हॉटेल परिसरात सापळा लावत, साई अमिन आणि राजा थेवर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर कोकण भवन येथून अनिल टाकसाळे यांनादेखील अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT