मुंबई

बिर्ला महाविद्यालयात पार पडली हवामान बदल विषयक राष्ट्रीय परिषद

CD

बिर्ला महाविद्यालयात हवामान बदल विषयक राष्ट्रीय परिषद
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त बी. के. बिर्ला महाविद्यालय येथील एनएसएस विभागातर्फे सोमवारी (ता. १४) ‘हवामान बदल आणि युवा : कृतीची वेळ’ या विषयावर एक दिवसीय आंतरविषयक राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत हवामान बदलाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी युवकांच्या सक्रिय सहभागाची गरज अधोरेखित करण्यात आली.
वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान, पूर, दुष्काळ आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे हवामान बदल ही वर्तमानातील जागतिक समस्या असल्याचे परिषदेत वक्त्यांनी नमूद केले. शाश्वत व पर्यावरणपूरक भविष्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही वक्त्यांनी सांगितले.
आयआयटी बॉम्बेतील सेवानिवृत्त प्राध्यापक अनिल सिंह यांनी वैज्ञानिक संशोधन व नैतिक जीवनशैलीद्वारे युवकांनी पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, असे प्रतिपादन केले. तर, प्राध्यापक डॉ. जयेश बेलारे यांनी संशोधन सादरीकरणांच्या दर्जाचे व युवकांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. नांदेडमधील सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे यांनी अतिथी म्हणून उपस्थिती लावली.
परिषदेत नामांकित संस्थांमधील तज्ज्ञ वैज्ञानिक व संशोधकांनी व्याख्याने सादर केली. यामध्ये हवामान बदल, शाश्वत विकास आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे पालन करण्याचे आवाहन केले. डॉ. अविनाश पाटील यांनी स्वागतपर भाषण केले, तर डॉ. हरिश दुबे व डॉ. महादेव यादव, उपप्राचार्य यांनी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. परिषदेचे आयोजन ओ. आर. चितलांगेजी, प्राचार्य, प्राध्यापक, एनएसएस स्वयंसेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. सोनाली राजपुर, राकेश भोईर, कोमल तिवारी आणि इतर विज्ञान शाखेतील प्राध्यापकांनी परिषद यशस्वी करण्यात सक्रिय भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT