मुंबई

माजी नगरसेवकमोहन उगले यांच्या जीवाला धोका

CD

मोहन उगले यांच्या जीवाला धोका
पोलिस संरक्षणाची मागणी
कल्याण, ता. १४ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच, राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांना लेखी पत्र दिले आहे.

मोहन उगले यांनी केडीएमसी निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र पक्षाच्या आदेशाचा मान राखून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. उगले यांचा आरोप आहे की, अर्ज मागे घेतल्यापासून काही समाजकंटक आणि राजकीय विरोधक त्यांच्यावर पाळत (रेकी) ठेवत आहेत. तसेच, विविध ठिकाणी त्यांना घेराव घालून इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विरोधकांकडून जीवे ठार मारण्याचा कट रचला जात असल्याची भीती व्यक्त करत उगले यांनी सुरक्षिततेसाठी तत्काळ दोन पोलिस सुरक्षा रक्षक तैनात करावेत. तसेच निवडणुकीचे वातावरण लक्षात घेता किमान १६ जानेवारीपर्यंत २४ तास सुरक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे. तसेच पोलिस संरक्षणासाठी लागणारे आवश्यक शासकीय शुल्क भरण्यासही त्यांनी तयारी दर्शवली आहे.

पोलिस प्रशासनाची भूमिका
निवडणुकीच्या काळात राजकीय तणाव वाढण्याची शक्यता असल्याने पोलिस उपायुक्त या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे कल्याणमधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

voting without voter ID : मतदार ओळखपत्र नसले तरीही करता येणार मतदान, जाणून घ्या कसं?

Big Blow: भारताच्या स्टार खेळाडूची IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेतूनही माघार; वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

Iran Calls India : अमेरिकेकडून हल्ला होण्याची भीती असताना, इराणने भारताला केला फोन अन्...

MCA: मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय! रोहित - रहाणेसह IPL खेळणाऱ्या खेळाडूंना देणार नाही करार; कारण घ्या जाणून

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT