मुंबई

जव्हारच्या पर्यटनाला खीळ

CD

जव्हारच्या पर्यटनाला खीळ
हनुमान पॉइंटवर पर्यटकांसाठी सुविधांचा अभाव
संदीप साळवे ः सकाळ वृत्तसेवा
जव्हार, ता. १४ : समुद्रसपाटीपासून शेकडो मीटर उंचीवरील जव्हारची ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळख आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले, धुक्याच्या चादरीत हरवलेले डोंगर, खोल दऱ्यांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मात्र, याच जव्हारमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ हनुमान पॉइंट येथे शासनाने कोट्यवधींचा खर्च करूनही मूलभूत सोयीसुविधा नसल्याचे विदारक चित्र आहे.
हनुमान पॉइंट हा परिसर निसर्गप्रेमी, पर्यटक, छायाचित्रकार तसेच स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पर्यटन विकासाच्या नावाखाली विविध योजनांतून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला आहे, पण येथे स्वस्त दरात मुक्काम, खानपानाची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने पर्यटक फार काळ थांबत नाहीत. त्यामुळे जव्हारच्या पर्यटनावर त्याचा परिणाम झाला आहे.
----------------------------
विकास फक्त कागदोपत्री
- निसर्गसंपदेने नटलेला हनुमान पॉइंटचा विकास कागदोपत्री झालेला आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही येथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही.
- उभारलेली प्रसाधनगृह व्यवस्था निष्क्रिय असून, वापरण्यायोग्य नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच बसण्यासाठीचे बाकडे मोडकळीस आले आहे, तर अनेक दिवसांपासून पथदिवे बंद अवस्थेत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
-------------------------------
जव्हार शहरालगत असलेल्या हनुमान पॉइंटवरील काट्या मारुती मंदिर श्रद्धेचे स्थान मानले जाते, पण राजकीय उदासीनतेमुळे येथे सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.
- राजेश धात्रक, पर्यटन संशोधक, जव्हार
-----------------------
हनुमान पॉइंट प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रशासनाला कळवले आहे.
- कुणाल उदावंत, उपनगराध्यक्ष, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाआधीच सरकारचा मोठा धक्का! ‘या’ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ नाही

Dapoli Accident News: शेवटचा पेपर देऊन घरी परतताना अपघात, २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू; मैत्रिण गंभीर जखमी

Petrol-Diesel-CNG Price: अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्चे तेल 5% महाग! पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर

Live Marathi News Update : केसनंद कचरा आंदोलनानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल

Farmer Loan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात, दोन लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ

SCROLL FOR NEXT