मुंबई

उमेदवारांची चोख रणनीती

CD

उमेदवारांची चोख रणनीती
कार्यकर्ते कामाला लागले; गल्ली, इमारतीच्या जबाबदाऱ्या सोपवल्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : यंदा नगरसेवक व्हायचंच म्हणून मैदानात उतरलेल्या उमेदवारांना आधी पक्षाचे तिकीट मिळावे, यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर उमेदवारी अर्ज वैध ठरावा म्हणून केलेली कागदपत्रांची जुळवाजुळव, प्रचारासाठी कार्यकर्त्यांची जमवा-जमव, सभा, प्रचार फेरीचे नियोजन आणि अर्थिक रसद अशा एक ना अनेक अडथळ्यांची शर्यत पार केलेल्या उमेदवारांची उद्या गुरुवारी खऱ्या अर्थाने परीक्षा आहे. गेल्या महिनाभरात केलेले नियोजन आणि रणनीती किती कामी आली याचा प्रत्यय दिवसभरातील कार्यकर्त्यांच्या हालचाली आणि त्यांच्या देहबोलीतून येणार आहे. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त मतदारांनी सकाळच्या वेळेत मतदानाचा हक्क बजवावा म्हणून उमेदवारांनी कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत आहे. सदरची निवडणूक शिवसेना (ठाकरे)-मनसे युती, शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती, काँग्रेस-वंचित आघाडी अशी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक जण बंडखोरी करत विरोधी पक्षातून, अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदा प्रचार तळागाळात पोहोचल्याने संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. त्यासाठी उमेदवार, कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असली तरी जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने किती मते मिळतील याबाबत सर्वच जण साशंक आहेत. मत विभागणीमुळे कोणालाच विजयाची हमी नाही. त्यामुळेच सर्वच उमेदवारांनी अखेरच्या क्षणापर्यंत मैदानात राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी सकाळपासूनचे चोख नियोजन लावले आहे.

बूथवर, मतदान केंद्राबाहेर आणि टेबलवर कार्यकर्ते तैनात
घरातून निघालेल्या मतदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे याची माहिती देण्यासाठी विभागात टेबल घालून कार्यकर्ते बसवले जाणार आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर एखाद्या उमेदवाराने मतदारांवर दबाव आणू नये म्हणून तेथेही कार्यकर्ते ठेवले जाणार आहेत. बूथवर काही संशय आल्यास किंवा दुबार मतदार आढळल्यास तत्काळ आक्षेप नोंदवण्यासाठी अधिकृत प्रतिनिधी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती एका उमेदवाराने दिली.

मतदारांच्या कलाकडे लक्ष
मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचा कुणाकडे कल आहे. त्यांची देहबोली काय सांगते याकडे लक्ष ठेवण्यासाठी उमेदवारांनी आपली यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे आपली बाजू किती कशी आहे, याचा अंदाज उमेदवारांकडून लावला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election 2026 : राजकीय वातावरण तापलं! धुळ्यात शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक, खुर्च्यांची केली तोडफोड; भाजपने हल्ला केल्याचा आरोप

Mumbai Politics: विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली; भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल, काय म्हणाले?

PF Withdrawal via BHIM App: लवकरच ‘BHIM’ अ‍ॅप द्वारेही ‘PF’ काढता येणार!, जाणून घ्या ‘ही’ सुविधा कधी उपलब्ध होणार?

Nagpur Crime : "मुलगी आईकडे देणार नाही"; नागपुरात रागाच्या भरात बापाने चिमुकल्या मुलीचा घेतला जीव!

Pune Holkar Bridge : होळकर पुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; धडक देऊन चालक पसार!

SCROLL FOR NEXT