मुंबई

डायल ११२ आपत्कालीन सेवा विशेष उपयोगी

CD

डायल ११२ आपत्कालीन सेवा विशेष उपयोगी
वर्षभरात रायगड पोलिसांना २०, ६१७ नागरिकांचे मदतीसाठी कॉल
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची पोलिस मदत मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेली ‘डायल ११२’ हेल्पलाइन सेवा रायगड जिल्ह्यात अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातून तब्बल २०,६१७ नागरिकांनी मदतीसाठी ११२ क्रमांकावर कॉल केला असून, पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देत अनेक प्रसंगात नागरिकांना दिलासा दिला आहे.
डायल ११२ या अत्याधुनिक आपत्कालीन सेवेमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना काही मिनिटांतच पोलिस मदत उपलब्ध होत आहे. कॉल प्राप्त होताच संबंधित ठिकाणाची माहिती नियंत्रण कक्षातून जवळच्या पोलिस पथकाला देण्यात येते. त्यानुसार प्रशिक्षित अधिकारी व अंमलदारांचे पथक अत्याधुनिक वाहनांसह घटनास्थळी पोहोचते. आकडेवारीनुसार, सरासरी ६.१६ मिनिटांत पोलिस घटनास्थळी दाखल होत असून, ही वेळ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. गेल्या वर्षभरात आलेल्या एकूण कॉलपैकी सुमारे ९० टक्के कॉल्स यशस्वीपणे स्वीकारण्यात आले आहेत. घरगुती भांडणे, किरकोळ वाद, मारामारी, रस्ते अपघात, चोरी, संशयास्पद हालचाली तसेच घडलेला गुन्हा अशा विविध कारणांसाठी नागरिक ११२ क्रमांकावर संपर्क साधत आहेत. यामध्ये घरगुती व सार्वजनिक भांडणांच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. २४ तास कार्यरत असलेली ही सेवा ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी विशेषतः उपयोगी ठरत आहे. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचत असल्याने अनेक वेळा संभाव्य गंभीर परिस्थिती टळल्याचेही निदर्शनास आले आहे.
........................
प्रतिक्रिया :
रायगड जिल्हा पोलिस दलाकडे डायल ११२ प्रणालीद्वारे वर्षभरात २० हजारांहून अधिक मदतीचे कॉल आले. सर्व कॉल्सना प्रतिसाद देत पोलिसांनी मदत केली असून, सरासरी ६.१६ मिनिटांत आमचे पथक घटनास्थळी पोहोचत आहे.
-आंचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election 2026 : मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न? पिंपरी-चिंचवडमध्ये वॉशिंग मशीन, तर नवी मुंबई अन् अमरावतीत पैशांचा बॅगा जप्त

Accident News: भीषण! ट्रक आणि एर्टिगा कारचा भयंकर अपघात; ६ महिलांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, गाडीचा चक्काचूक

Pakistan Cricket: भिकारड्या पाकिस्तानवर वाईट वेळ! क्रिकेट संघ काढला विक्रीला; लिलावाची केली घोषणा

Railway Accident : भीषण दुर्घटना! क्रेन रेल्ववर कोसळली; २२ जणांचा मृत्यू, ३० पेक्षा अधिक जखमी

Tamhini Ghat Crime : ताम्हिणी घाट खून प्रकरणातील फरार आरोपीला धावत्या एक्सप्रेसमधून बेड्या; लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT