मुंबई

डायलिसिस रुग्णांचे सवलतीसाठी एसटीला साकडे

CD

डायलिसिस रुग्णांचे सवलतीसाठी एसटीला साकडे
वातानुकूलित बसमध्ये विनामूल्य योजना लागू करण्याची मागणी
श्रीवर्धन, ता. १४ (वार्ताहर) : डायलिसिस रुग्णांसाठी महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) माध्यमातून उपचार व तपासणीसाठी विनामूल्य प्रवास सवलत योजना लागू केली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही योजना कागदोपत्रीच मर्यादित राहिल्याचा आरोप श्रीवर्धन तालुक्यातील डायलिसिस रुग्णांनी केला असून, एसटी प्रशासनाच्या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
एसटी महामंडळाच्या नियमानुसार डायलिसिस रुग्णांना उपचारासाठी जिल्हा अथवा इतर ठिकाणी जाण्यासाठी एसटीच्या साध्या बसेसने १०० किलोमीटर अंतरापर्यंत महिन्याला केवळ दोन फेऱ्यांसाठी १०० टक्के सवलत दिली जाते. त्यानंतरच्या प्रवासासाठी पूर्ण तिकीट भाडे आकारले जाते. विशेष म्हणजे ही सवलत शिवशाही, स्लीपर कोच किंवा वातानुकूलित बसेससाठी लागू नसल्याने रुग्णांना मोठ्या आर्थिक व शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील अनेक डायलिसिस रुग्णांना उपचारासाठी आठवड्यातून तीन वेळा पनवेल येथील रुग्णालयात जावे लागते. मात्र, श्रीवर्धन आगारातून मुंबई-पनवेल मार्गावर साध्या बसचे प्रमाण कमी करून बहुतांश फेऱ्या शिवशाही व स्लीपर कोच बसच्या सुरू करण्यात आल्या आहेत. परिणामी, रुग्णांना वेळापत्रकाच्या अडचणींसह पूर्ण दराचे तिकीट काढण्याशिवाय पर्याय राहत नाही. याशिवाय श्रीवर्धन ते वडखळ हे अंतर १०० किलोमीटरमध्ये बसत असले, तरी वडखळ ते पनवेल या पुढील प्रवासासाठी रुग्णांना पूर्ण भाडे भरावे लागते. उपचारासाठी नियमित प्रवास करावा लागणाऱ्या रुग्णांसाठी ही बाब आर्थिकदृष्ट्या अत्यंत जाचक ठरत आहे. त्‍यामुळे या योजनेत काहीसा बदल करून डायलिसिस रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
..............
प्रतिक्रिया :
मी आठवड्यातून तीन वेळा पनवेलला डायलिसिससाठी जातो. साध्या बससाठी दोन वेळाच सवलत मिळते, उरलेल्या वेळी पूर्ण भाडे द्यावे लागते. आम्हालाही सर्व प्रकारच्या बसेससाठी, तेही कायमस्वरूपी १०० टक्के सवलत द्यावी.
- रितेश तोडणकर, दांडा, श्रीवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election 2026 : राजकीय वातावरण तापलं! धुळ्यात शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक, खुर्च्यांची केली तोडफोड; भाजपने हल्ला केल्याचा आरोप

Mumbai Politics: विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली; भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल, काय म्हणाले?

PF Withdrawal via BHIM App: लवकरच ‘BHIM’ अ‍ॅप द्वारेही ‘PF’ काढता येणार!, जाणून घ्या ‘ही’ सुविधा कधी उपलब्ध होणार?

Nagpur Crime : "मुलगी आईकडे देणार नाही"; नागपुरात रागाच्या भरात बापाने चिमुकल्या मुलीचा घेतला जीव!

Pune Holkar Bridge : होळकर पुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; धडक देऊन चालक पसार!

SCROLL FOR NEXT