मुंबई

जिल्‍हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी

CD

जिल्‍हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी
आचारसंहितेचे पालन करण्याचे प्रांताधिकारी यांचे आवाहन
पेण, ता. १४ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांनी उमेदवार, राजकीय पक्ष, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले.
प्रांताधिकारी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यात ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गण असून या निवडणुकीत एकूण १ लाख ३९ हजार ४७९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी तालुक्यात १९० मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून ही मतमोजणी मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या केईएस शाळेत पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ ते २० जानेवारी दरम्यान होणार आहे. त्यानंतर २७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे व निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. या संपूर्ण कालावधीत कोणताही आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
...............
प्रशासन सज्ज
आचारसंहितेअंतर्गत शासकीय यंत्रणांचा गैरवापर, अनधिकृत प्रचार, बेकायदेशीर खर्च किंवा मतदारांवर दबाव आणण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा बाबी निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेस नायब तहसीलदार नितीन परदेशी, प्रसाद कालेकर, तुषार कामत, गटशिक्षणाधिकारी उर्मिला शेंडे आदी अधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रांताधिकारी पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT