मुंबई

बोरिंगच्या ट्रान्सफॉर्मरवर चोरट्यांचा डल्ला

CD

बोरिंगच्या ट्रान्स्फॉर्मरवर चोरट्यांचा डल्ला
सणासुदीच्या काळातच पाणीपुरवठ्यावर परिणाम; नागरिकांची गैरसोय
कर्जत, ता. १५ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते गावाच्या बाहेर, उल्हास नदीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ महावितरणच्या विद्युत ट्रान्स्फॉर्मरची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ट्रान्स्फॉर्मरवरील तांब्याची कॉइल चोरट्यांनी लंपास केल्यामुळे संपूर्ण कोल्हारे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा काही काळासाठी ठप्प झाला होता. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली.
बुधवारी (ता. १४) संक्रांतीच्या दिवशी रात्री नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा बंद करून कर्मचारी निघून गेला होते. मात्र पहाटे पाणी सुरू करण्यासाठी आल्यानंतर बोरिंग सुरू होत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर केलेल्या पाहणीत पाण्याची टाकी व बोरिंगला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्स्फॉर्मरमधील तांब्याची कॉइल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. ही बाब तत्काळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या वतीने नेरळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. महावितरणकडूनही या चोरीबाबत स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला असून, यापूर्वीही अशा प्रकारच्या ट्रान्स्फॉर्मर चोरीच्या घटना परिसरात घडल्याचे सरपंचांनी सांगितले. दरम्यान, चोरीमुळे विद्युतपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा तात्पुरता बंद पडला होता. मात्र, ग्रामपंचायतीने तातडीने हालचाली करत आवश्यक सामग्री उपलब्ध करून विद्युत जोडणी पूर्ववत केली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला, अशी माहिती सरपंच महेश विरले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT