एक लाख प्रवाशांचा टप्पा पार
नवी मुंबई विमानतळाला १९ दिवसांत पसंतीची मोहर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए)ने प्रवासी वाहतुकीमध्ये उद्घाटनानंतर विक्रमी टप्पा गाठला आहे. व्यावसायिक कार्यसंचालनांना सुरुवात केल्याच्या १९ दिवसांमध्ये एक लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. यामधून प्रवाशांची मोठी पसंती आणि प्रवास मागणीमधील स्थिर वाढ दिसून येत आहे.
१२ जानेवारी २०२६ पर्यंत एनएमआयएने एकूण एक लाख नऊ हजार ९१७ प्रवाशांची हाताळणी केली. यामध्ये ५५,९३४ प्रवाशांनी आगमन केले, तर ५३,९८३ प्रवाशांनी प्रस्थान केले. एअरपोर्टने १० जानेवारी २०२६ला सर्वाधिक व्यस्त दिवसाची नोंद केली. एका दिवसामध्ये ७,३४५ प्रवाशांची हाताळणी करण्यात आल्याची नोंद झाली आहे. या कालावधीदरम्यान एनएमआयएने ७३४ एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्सचे (एटीएम) व्यवस्थापन केले. यात ३२ जनरल एव्हिएशन एटीएमचा समावेश होता. यामधून नियोजित व जनरल एव्हिएशन ऑपरेशन्समध्ये वाढता वापर दिसून येतो. एकूण ४०,२६० आगमन प्रवासी सामान आणि ३८,७७४ प्रस्थान प्रवासी सामान प्रोसेस करण्यात आले. या आकडेवारीतून सामानाची कार्यक्षमपणे हाताळणी करण्याची क्षमता दिसून आली. तसेच सर्वांना वेळेत सामान मिळाल्यामुळे प्रवाशांनी एनएमआयएलबाबत अधिक चांगल्या प्रतिक्रिया दिल्या.
प्रवाशांना उत्साहवर्धक प्रवासाचा अनुभव
मालवाहतुकीसंदर्भात एनएमआयएने २२.२१ टन कार्गोची हाताळणी केली. विमानतळाचा सुरुवातीपासून प्रवासी व मालवाहतूक कार्यसंचालनाप्रति एकीकृत दृष्टिकोन दिसून येतो. कनेक्टिव्हिटीसंदर्भात दिल्ली, गोवा व बंगळूर प्रमुख क्षेत्रे ठरली. आधुनिक पायाभूत सुविधा, सुव्यवस्थित प्रक्रिया आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेवर फोकससह एनएमआयए टप्प्याटप्प्याने सेवा वाढवत आहे. तसेच सुरक्षितता, सेवा दर्जा आणि प्रवाशांना उत्साहवर्धक प्रवासाचा अनुभव देण्याचे उच्च मानक राखत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.