मुंबई

चारोटी उड्डाणपुलावर कारला अपघात

CD

चारोटी उड्डाणपुलावर कारला अपघात
चौघे जखमी, दीड वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर
कासा, ता. १५ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. या अपघातात कारमधील चार प्रवासी जखमी असून दीड वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.
नियंत्रण सुटल्याने भरधाव कार गुरुवारी (ता. १५) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुभाजकाला धडकली होती. त्यात अर्चना साहू (२५), शिल्पा साहू (२८), वाहनचालक सुशांत साहू (३२) आणि अल्मा साहू (दीड वर्षे) जखमी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना प्रथम कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागझरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कासा पोलिस व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून काही काळ निर्माण झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली.
----------------------------
धोकादायक वळण
चारोटी उड्डाणपुलावरील धोकादायक वळण अपघातामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. उड्डाणपुलावर चढ, अचानक वळण असल्याने याठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. या ठिकाणी सुधारणा करण्याची वारंवार मागणी करूनही महामार्ग प्राधिकरणाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT