मुंबई

कळव्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का

CD

कळव्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का
माजी नगरसेवक उमेश पाटील पराभूत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : कळव्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. येथील प्रभाग क्रमांक ९ मधील पॅनेल ‘ड’चे उमेदवार माजी नगरसेवक उमेश पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी पाटील यांचा दोन हजार ५७८ मतांनी पराभव केला आहे. या पॅनेलमध्ये तीन उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले असताना, एक जागा गमवावी लागल्याने पूर्ण पॅनेल विजयाचे स्वप्न भंगले आहे.
कळव्यातील प्रभाग क्रमांक ९ हा शिवसेनेचा गड समजला जातो. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून चारही पॅनेलवर शिवसेनेने विजय मिळवला होता. त्यामुळे या वेळी शिवसेना शिंदे गटाने माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली होती. त्यापैकी विजया लासे, अनिता गौरी आणि गणेश कांबळी यांनी विजय मिळवला आहे. उमेश पाटील यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. पाटील यांना १२ हजार २९९ मते मिळाली, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांना १४ हजार ८७७ मते मिळाली आहेत. शिवसेना शिंदे गट आणि उमेश पाटील यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत ठाकरे बंधूंना अजूनही विश्वास; संजय राऊत म्हणाले, ''अद्यापही...''

Devendra Fadnavis Reaction : महापालिका निवडणुकांमधील ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

फरहान खानची मुख्य भूमिका असलेला 120 बहादूर आता पहा ओटीटीवर ! कधी आणि कुठे घ्या जाणून

WPL 2026 : डॅनी व्हॅटसह गुजरात जायंट्सच्या खेळाडू पोहोचल्या धारावीत; इंग्लंडची खेळाडू म्हणाली, येथील लोकं...

Pune Election Results: पती-पत्नीचा दणदणीत विजय; पुण्यातल्या 'या' प्रभागाची राज्यात होती चर्चा

SCROLL FOR NEXT