मुंबई

अपघांत साईपालखीतील २ पदयात्री ठार ; तिघेजण गंभीर जखमी

CD

अपघातात दोन ठार; तिघे जण गंभीर जखमी
शहापूर, ता. १६ (वार्ताहर) : मुंबई-नाशिक महामार्गावर शुक्रवारी (ता. १५) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत शिर्डीला जाणाऱ्या साईपालखीतील दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईच्या अँटॉप हिल येथील यंग बॉइज स्पोर्टस् क्लबचा वैभव मळीक (वय २६) या पदायात्रीला अनोळखी वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.१५) घडली. मुंबई-नाशिक महामार्गावर चेरपोलीजवळ सकाळी हा अपघात घडला. शहापूर पोलिस वाहनाचा शोध घेत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक एम. बी. कपिले यांनी सांगितले.
तर दुपारी गोलभन गावाजवळ झालेल्या दुसऱ्या अपघातात साईपालखीतील पदयात्री स्वप्नील शशिकांत साळुंखे (वय २४, रा. डोंबिवली) याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या सोबतचे पदयात्री युवराज अनिल गोंधळी (वय १७, रा. ठाणे), हर्ष अतिष गायकवाड (वय २२, रा. ठाणे) आणि केशव अरुण खाडे (वय २२, रा. ठाणे) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खर्डी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उचारासाठी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Ramwadi–Wagholi Metro: रामवाडी - वाघोली मेट्रो मार्ग, सरकारी विभागांची संयुक्त पाहणी, अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा, ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणार

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची 'खेळी', आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केली मोठी घोषणा

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT