मुंबई

बहुमत कुणालाच नाही, सत्तासमीकरणांची धावपळ

CD

बहुमत कुणालाच नाही, सत्तासमीकरणांची धावपळ
उल्हासनगरचा कौल अनिश्चित; राजकीय हालचालींना वेग; सत्ता स्थापनेसाठी कसोटी

उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : आज उल्हासनगरच्या राजकारणाचा श्वास रोखून धरणारा दिवस होता. सकाळपासूनच मतमोजणी केंद्र परिसरात प्रचंड गर्दी, उमेदवारांची अस्वस्थ पावले, कार्यकर्त्यांच्या प्रार्थना आणि प्रत्येक फेरीच्या निकालाकडे लागलेली उत्कंठा या साऱ्यांनी वातावरण अक्षरशः भारून टाकले होते. विजयाच्या आशेने आलेले चेहरे, तर पराभवाच्या भीतीने ताणलेल्या नसा, अशा मिश्र भावनांमध्ये निकाल जाहीर झाले; मात्र उल्हासनगरमध्ये कुणालाच पूर्ण बहुमत मिळाले नसल्याचा स्पष्ट संदेश या निकालाने दिला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या ७८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ३७ जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली, तर शिवसेना (शिंदे गट) ३६ जागांवर थांबली. वंचित बहुजन आघाडीने दोन जागा, काँग्रेसने एक, स्थानिक साई पक्षाने एक, तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. विशेष बाब म्हणजे, उबाठा शिवसेना आणि मनसे यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे अनेक राजकीय समीकरणांना छेद देणारा हा निकाल ठरला आहे.

मतमोजणी केंद्रातील तणावपूर्ण क्षण
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीसोबत वातावरण बदलत होते. एखाद्या फेरीत आघाडी घेतलेला उमेदवार पुढील फेरीत पिछाडीवर पडत असल्याचे चित्र दिसत होते. निकाल लागल्यानंतर काही ठिकाणी जल्लोष झाला, तर काही ठिकाणी शांत निराशा पसरली.

महापौरपदासाठी राजकीय गणित
महापौरपदासाठी आवश्यक असलेला ४० जागांचा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता न आल्याने आता खरी राजकीय खेळी सुरू झाली आहे. भाजपकडून महापौरपदावर दावा करण्यात येत असला, तरी सत्ता स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे. शिंदे गटासोबत युती होणार की वंचित, अपक्ष आणि स्थानिक पक्षांच्या जोरावर नवे सत्तासमीकरण उभे राहणार याबाबत शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पुढील घडामोडींकडे लक्ष
या निकालामुळे उल्हासनगरच्या राजकारणात स्पष्ट बहुमताऐवजी अनिश्चितता आणि सौदेबाजीचे राजकारण सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत बैठका, चर्चा आणि अचानक बदलणाऱ्या भूमिका शहराचे राजकीय चित्र ठरवतील. तोपर्यंत, आजच्या निकालाने एवढे मात्र निश्चित झाले आहे. उल्हासनगरमध्ये सत्ता स्थापन करण्याची खरी लढाई आता सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमची जोरदार मुसंडी विजया जागांचं ठोकलं शतक

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT