मुंबई

मुंबईत आवाज कुणाचा

CD

पहारेकरी भाजप सत्तेत
ठाकरेंची पीछेहाट; मात्र आवाज कायम


विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महापालिकेवर तीन दशके राज्य करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचे भाजपचे स्वप्न आज साकार झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेत मैदानात उतरलेल्या भाजपने २२७ पैकी एकत्रित ११६ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबईची सत्ता आता भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांच्या हाती आली आहे. पहारेकरी भाजप सत्तेत आला असून, आता ठाकरेंच्या शिवसेनेला पहारेकऱ्याची भूमिका वठवावी लागणार आहे.
भाजपने संपूर्ण ताकद लावली असली तरी या वेळी पाच-सहाच जागा जास्त मिळवता आल्या. दुसरीकडे पक्ष, चिन्ह आणि ६२ नगरसेवक गमावूनही मुंबईतील आपली ताकद शाबूत ठेवण्यात ठाकरेंना यश मिळाल्याचे सत्य हा निकाल अधोरेखित करणारा आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली मतमोजणी, क्षणोक्षणी बदलणारी आकडेवारी यामुळे सुरुवातीपासून शांततेत सुरू असलेल्या मुंबई पालिकेची निवडणूक निकालाच्या दिवशी उत्कंठा वाढवणारी ठरली. मुंबईत आवाज कुणाचा याचे संमिश्र उत्तर देणे मुंबईकरांनी पसंत केल्याचे या निकालावरून स्पष्ट होते. मुंबई महापालिका निवडणुकीत या वेळी धक्कादायक आकडे येणार असल्याची शक्यता बहुतांश एक्झिट पोलनी वर्तवली होती; मात्र प्रत्यक्षात मुंबईतील चित्र थोडेसे वेगळे ठरले. गेल्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेत भाजपच्या केवळ दोन जागा कमी आल्या होत्या. मात्र, या वेळी त्याची कसर भरून काढली.
...
पालिकेचे चित्र
मुंबई महापालिकेत भाजपने १३७ जागा लढवीत ८८ जागांवर विजय मिळवला, तर ९० जागांवर लढत असलेल्या शिवसेनेला केवळ २८ जागा मिळविता आल्या. मतांचा पॅटर्न बघता भाजपची शिंदे यांना सोबत घेण्याची रणनीती अतिशय योग्य होती. काँग्रेसने वंचितसोबत युती करून २०१ जागांवर आपले उमेदवार उतरवले; मात्र या वेळी काँग्रेसची घसरण २५ पर्यंत येऊन ठेपली आहे. तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले. ठाकरेंच्या शिवसेनेने १६३ जागा लढवून ६७ जागा जिंकल्या, तर ५१ जागांवर उमेदवार दिलेल्या मनसेला मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने अनपेक्षितपणे मुस्लिमबहुल भागात मुसंडी मारीत तब्बल आठ जागा जिंकून दमदार पुनरागमन केले.
...
विकास आणि मराठीचा अजेंडा
भाजपने या वेळी मुंबईत केलेल्या अटल सेतू, भुयारी बोगदे आणि मेट्रोच्या विकासाची केलेली कामे व अभ्युदय नगर, रमाबाई आंबेडकर, बीडीडी चाळ, मोतीलाल नगर पुनर्विकासाचे प्रकल्प समोर ठेवून मुंबईकरांची मते मागितली होती. याला मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला; मात्र ठाकरे बंधूंचा मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचा मुद्दाही मराठी जनांना भावल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबईत विकासकामे आणि मराठी अस्मितेचे मुद्दे हे यापुढेही कायम राहणार असल्याचे संकेतही या निकालाने दिले आहेत.
...
निकालाची ठळक वैशिष्ट्ये
- भाजप सर्वांत मोठा पक्ष
- शिवसेना-काँग्रेस एकत्र नसल्याचा फटका
- ठाकरेंचा मराठी मतदारांवरील प्रभाव कायम
- काँग्रेसची ३१ वरून २६ जागांवर घसरण
- आठ जागा जिंकून ‘एमआयएम’ची दमदार कामगिरी
- मनसे आणि शिवसेनेची अपेक्षित कामगिरी नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT