मुंबई

भिवंडीत त्रिशंकू परस्थिती

CD

भिवंडीत त्रिशंकू परिस्थिती
भाजपची मुसंडी, कोणार्कने राखला गड
ठाणे, ता. १६ : भिवंडी महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता. मतमोजणीत मात्र काँग्रेस मोठा भाऊ ठरला असला, तरी भाजपनेही मुसंडी मारली आहे. शिंदे सेनेने आपला गड राखण्यात यश मिळविले, तर कोणार्क विकास आघाडीने पूर्ण पॅनेल निवडून आणले. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, समाजवादी पक्षासह विविध राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली होती; मात्र निकालानंतर भाजप वगळता कोणत्याही एका पक्षाला वर्चस्व सिद्ध करता आले नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसने ४७ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. या वेळी मात्र काँग्रेसचे शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन आणि समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्यात झालेल्या वादामुळे काँग्रेसमध्ये फूट पडली. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. काँग्रेसने ५८ जागा लढविल्या, त्यापैकी केवळ ३० जागांवर, तर समाजवादी पक्षाला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले. आमदार रईस शेख यांनी काँग्रेसची तिकिटे आपल्या समर्थकांना दिल्याचा आरोप असून, काँग्रेसचे काही निवडून आलेले नगरसेवक शेख गटासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रईस शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांना उघड मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे १२ उमेदवार विजयी झाले; मात्र अजित पवार गटाला एकही जागा जिंकता आली नाही.
दरम्यान, उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे यांची युती असली तरी ती भिवंडीत प्रभावी ठरली नाही. ठाकरे शिवसेनेने २८ जागा लढवूनही एकही जागा जिंकली नाही. मनसेलाही दोन जागांवर अपयश आले. दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रचारात सहभाग घेतला नाही, तरी धनुष्यबाण चिन्हावर २० पैकी १२ उमेदवार विजयी झाले. भाजपने मुसंडी मारत ३२ पैकी २२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला.
----
पक्षीय बलाबल
भाजप - २२
काँग्रेस - ३०
शिवसेना शिंदे गट - १२
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - १२
समाजवादी पक्ष - ६
कोणार्क विकास आघाडी - ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT